Blackmail | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

दिल्लीतील (Delhi Crime News) एका 74 वर्षीय व्यावसायिकाला मुंबईतील (Mumbai Crime) एका महिलेने हनीट्रॅप (Honeytrap) केले आणि ब्लॅकमेल (Blackmail) केले. धक्कादायक म्हणजे या महिलेच्या मधाळपणावर दिल्लीतील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizen Fraud) असलेला हा व्यक्ती इतका भाळला की, तिने वेळोवेळी उकळलेल्या खंडणी (Extortion Case) स्वरुपातील पैशांमुळे त्यास तब्बल 18 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. पीडित व्यक्तीने दिलेली तक्रार आणि उपलब्ध करुन दिलेल्या पुराव्यांनंतर पोलिसांनी मालवणी (Malwani Police) येथील महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सुरु आहे.

हनीट्रॅप कसा उघडकीस आला?

हनीट्रॅप आणि ब्लॅकमेलिंगचा बळी ठरलेला दिल्ली येथील हा ज्येष्ठ व्यक्ती वैद्यकीय साहित्यांचा व्यवसाय करतो. सन 2015 मध्ये त्याच्या पत्नीचे निधन झाले. ज्यामुळे तो एकटेपणाचे आयुष्य जगत होता तसेच काहीसा निराशही होता. दरम्यान, त्याने एका सलूनला भेट दिली. तिथे त्याने केशरचना केल्यानंतर सलूनमधील व्यक्तीशी झालेल्या संवादात एखादा महिला जोडीदार मिळाला तर बरे होईल, असे सांगितले. तोच धागा पकडत सलूनमधील व्यक्तीने त्यास रेश्मा नावाच्या महिलेचे संपर्क तपशील दिले. इथूनच पुढची कहाणी सुरु झाली. (हेही वाचा, Uttar Pradesh: ब्लाइंड डेटवर गेलेल्या 50 वर्षीय इसमाचे अपहरण; महिला आणि तिच्या साथीदारांना झाशी येथून अटक)

'अर्थ'पूर्ण संबंध

रेश्मा नावाच्या महिलेने या व्यवसायिकाची अनेक महिलांशी ओळख करुन दिली. पण, त्यांच्यात कोणताही 'अर्थ'पूर्ण संबंध निर्माण झाला नाही. त्यामुळे तिने मार्च 2023 मध्ये त्यास मुंबईच्या मालवणी येथील मिरा नामक विवाहित महिलेचा फोटो पाठवला. तक्रारदाराने रस दाखवला, ज्यामुळे त्यांची समोरासमोर भेट झाली. (हेही वाचा, Kanpur Crime News: कानपूरमध्ये 30 लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचे अपहरण करून हत्या, तिघांना अटक)

गोवा ट्रिप आणि ब्लॅकमेलची सुरुवात

प्रत्यक्ष भेटीनंतर तक्रारदार आणि सदर महिला यांच्यातील भेटी ठरल्या. तक्रारदार मे 2023 मध्ये मालवणी येथील एका रिसॉर्टमध्ये मीराला भेटण्यासाठी मुंबईला गेला. त्यांचे नाते पुढे सरकले आणि ते गोव्याला गेले, जिथे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कालांतराने, मीराने वैयक्तिक खर्चाचे कारण देत पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. तिच्या मागण्या वाढत गेल्या आणि तिने अखेर 4 कोटी रुपयांच्या अपार्टमेंटसाठी आग्रह धरला, जो तक्रारदाराने खरेदी करण्यास नकार दिला.

मिरा हिने तक्रारदाराला मालाड पूर्व येथे भेटण्यासाठी बोलावले. आणखी एका जवळच्या भेटीनंतर, ती दिंडोशी पोलिस ठाण्यात गेली आणि त्याच्याविरुद्ध खोटी बलात्काराची तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी वर्षभरात 18 लाख रुपये उकळण्यासाठी या तक्रारीचा वापर केला.

दरम्यान, मिराच्या एका जुन्या मैत्रिणीने या प्रकरणाचा भांडाफोड केला. मिराकडे या मैत्रिणीचे काही पैसे कथीतरित्या आडकले होते. ज्यामुळे त्यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यामुळे नाराज असलेल्याया मैत्रिणीने तक्रारदाराकडे रेकॉर्डिंग आणि पुरावे घेऊन संपर्क साधला. त्या सांगितले की, मिराने जाणूनबुजून त्याला अडकवण्याचा आणि खंडणी मागण्याचा कट रचला होता. या पुराव्यासह, ज्येष्ठ नागरिकाने मालवणी पोलिसांकडे संपर्क साधला, ज्यांनी मीराविरुद्ध खंडणीसाठी एफआयआर नोंदवला. अधिकाऱ्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.