Deglur-Biloli Assembly By-election: देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी? उद्या मतमोजणी
Gram Panchayat Elections | (File Image)

देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी (Deglur-Biloli Assembly By-election Result 2021) उद्या म्हणजेच 2 नोव्हेंबर रोजी पार पडत आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक पार पडली. काँग्रेस पक्षाचा विद्यमान अमदार असलेल्या या मतदारसंघात भाजपनेही ताकद लावली होती. त्यामुळे अशोक चव्हाण, देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे महत्त्वाचे नेते मतदारसंघात तळ ठोकून होते. महत्त्वाचे म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही या ठिकाणी उमेदवार दिला होता. त्यामुळे बहुरंगी झालेल्या या निवडणुकीत जनता कोणाच्या पाटी उभी राहणार याबाबत उद्याच स्पष्टता येणार आहे.

कोणकोणते उमेदवार रिंगणात

  • जितेश रावसाहेब अंतापूरकर (काँग्रेस)
  • सुभाष पिराजीराव साबणे (भाजप
  • उत्तम रामराव इंगोले (वंचित बहुजन आघाडी)
  • विवेक पुंडलिकराव केररकर (जनता दल (सेक्युलर))
  • प्रा. परमेश्वर शिवदास वाघमारे (बहुजन भारत पार्टी)
  • डी डी वाघमारे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे))
  • अरुण कोंडीबाराव दापकेकर (अपक्ष)
  • साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष),
  • भगवान गोविंदराव कंधारे (अपक्ष),
  • मारुती लक्ष्मण सोनकांबळे (अपक्ष),
  • विमल बाबुराव वाघमारे (अपक्ष),
  • कॉ.प्रा. सदाशिव राजाराम भुयारे (अपक्ष)

    (हेही वाचा, Deglur-Biloli Assembly By-election: भाजपला आघाडी द्या, गाव जेवण देईन, चंद्रकात पाटील यांची ऑफर)

देगलूर बिलोली पोटनिवडणुकीसाठी तिरंगी सामना रंगणार आहे. काँग्रेसने जितेश अंतापूरकर, भाजपने सुभाष साबणे तर वंचित बहुजन आघाडीने डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी दिली आहे. या पोटनिवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यापैकी सहा उमेदवार अपक्ष आहेत. भाजपचे सुभाष साबणे हे शिवसेनेतून भाजपमध्ये आले आहेत.