Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मॉर्निक वॉक (Morning Walk) करणाऱ्या तीन महिलांना अज्ञात वाहनाने चरडल्याची धक्कादायक घटना पुणे (Pune) येथे घढली आहे. या तीनही महिला वयाने ज्येष्ठ होत्या. ही घटना नगर-कल्याण मार्गावर उदापूर येथे  बुधवारी सकाळी घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मिराबाई ढमाले आणि कमल ढमाले या दोन महिला एकाच कुटुंबातील आहेत. तर, या घटनेत ठार झालेल्या आणखी एका महिलेचे नाव समजू शकले नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनेची नोंद घेऊन अज्ञात वाहन आणि अज्ञात वाहनचालक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

या प्रकारानंतर स्थानिक नागरिक प्रचंड चिडले. त्यांनी या वाहन आणि वाहनचालकांचा तातडीने तपास करावा. तसेच, त्याला अटक करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली आहे. (हेही वाचा, लातूर भीषण अपघात : कारच्या धडकेत एकाच कुटुंबातील पाच जण ठार, सुदैवाने वाचले चिमुकलीचे प्राण)

मॉर्निंग वॉक करताना काय काळजी घ्यावी

मॉर्निंग वॉक करण्यासाठी तुम्ही जर मुख्य रस्त्याचा वापर करत असाल तर स्वत:हूनच काळजी घ्यायला हवी. मॉर्निंग वॉक करताना रस्त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूनेच चाला. कोणत्याही प्रकारे कानात हेडफोन घालून गाणी ऐकत रस्त्यावरुन चालणे टाळा किंवा बंद करा. आजूबाजूला लक्ष ठेवा. वाहनांचा वेग विचारात घ्या. शक्यतो आंधार असलेल्या रहदारीच्या रस्त्यावरुन मॉर्निंग वॉक टाळा.