भंडारा जिल्ह्यातील पवनीमध्ये एक दुर्देवी घटना घडली आहे. पवनी येथील गौशाळेत चारा पाण्याविना 30 जनावरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.  गडचिरोलीतील कुरखेडा पोलिसांनी कत्तलखान्यात नेणाऱ्या जनावरांना ताब्यात घेऊन धानोरीतील बळीराम गौशाळेत दोन दिवसांपूर्वी पाठवलं होते. मात्र, बळीराम गौशाळेत चारा आणि पाण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळं 30 जनावरे मृत पावली.  (हेही  वाचा -  Mumbai Shocker: महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या वडाळ्यातील 12 वर्षीय मुलाचा शीर नसलेला मृतदेह सापडला; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल)

गौशाळेत जनावरांना ठेवण्यासाठी शेड पाणी आणि चाऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे असताना, या गौशाळेकडे स्वतःच्या मालकीचे शेड नव्हतं. ही सर्व जनावरे उघड्यावर ठेवण्यात आल्याची गंभीर बाब या घटनेनंतर समोर आली आहे. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेच्या एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. दरम्यान या घटनेनंतर प्राणी प्रेमींनी सदर घटनेचा हा निषेध हा केला असून संचालकावर त्वरीत कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

बळीराम गौशाळेच्या संचालकांनी या जनावरांना निर्दयतेनं बांधून ठेवत त्यांना कुठल्याही प्रकारचा चारा किंवा पाण्याची व्यवस्था केली नाही. रात्रीला यातील 30 जनावरे मृत पावली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गौशाळेचे एका संचालकाला ताब्यात घेतलं आहे. मागील वर्षी या गौशाळेच्या अध्यक्षांसह 13 संचालकांवर गौशाळेतील जनावरे विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. यावेळी देखील गौशाळेच्या कारभारावर जोरजाक टिका ही झाली होती. असे असून देखील ही गौशाळ सुरु असल्याने आता संताप व्यक्त केला जात आहे.