मुंबई मध्ये 57 वर्षीय व्यावसायिकाने वांद्रे वरळी सी लिंक (Bandra-Worli Sea Link) वरून उडी मारून आपलं जीवन संपवलं आहे. आज अरबी समुद्रामध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे. आत्महत्या करणारा हा व्यावसायायिक खार (Khar) येथील रहिवासी होता. Tikam Makhija असं त्याचं नाव आहे. Tikam Makhija स्वतः गाडी चालवत सी लिंक वर आले. सोमवारी (31 जुलै) त्यांनी या सागरीसेतू वर गाडी पार्क करत समुद्रामध्ये उडी मारली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, Tikam Makhija मागील काही दिवस त्रस्त होते. मखिजा यांनी समुद्रामध्ये उडी मारल्याचं समजताच स्थानिक कोळी बांधव, अग्निशमन दल, नौदल, मुंबई पोलिस यांनी त्यांचा शोध सुरू केला. इंडियन नेव्हीच्या चेतक हेलिकॉप्टरने काही डायव्हर्स पाण्यात उतरले होते.
शोध पथकाला दुपार 2 च्या सुमारास मखिजा यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. मग तातडीने बोट बोलावून हा मृतदेह चैत्यभूमी जेट्टी वर आणण्यात आला. नक्की वाचा: Delhi 16 Years Olds Suicide: पालकांच्या अपेक्षा पुर्ण करू शकत नसल्याच्या नैराश्यातून 16 वर्षीय मुलाची आत्महत्या .
मखिजा कुटुंबाने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर शिवाजी पार्क पोलिस स्टेशन मध्ये अपघाती निधनाची नोंद करण्यात आली आहे.
कलिना परिसरामध्ये मखिजा यांचा मागील महिन्यात एक अपघात झाला होता. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला इजा झाली होती. मात्र या अपघतानंतर ते नैराश्यात गेले होते. त्यांच्यावर काही शस्त्रक्रिया झाल्या होत्या. पण यामधून ते अधिक वैफल्यग्रस्त होत गेले. आयुष्य संपवण्याबाबत ते कुटुंबियांशी बोलत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मखिजा यांनी आत्महत्येपूर्वी एका नातेवाईकाला फोन केला होता त्याच्याशी देखील ते आत्महत्येबाबत बोलले होते.