Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

बस आणि ट्रक (Bus Truck Accident) यांच्यात झालेल्या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत. जखमींतील काहींची प्रकृती गंभीर आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड (Daund Accident) तालुक्यात असलेल्या भांडगाव (Bhandgaon) येथे बुधवारी (1 फेब्रुवारी) पहाटे पाच वाजणेच्या सुमारास ही घटना घडली. अपघात घडला त्या वेळी बसमद्ये तब्बल 50 जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. सोलापूरहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर बसने ट्रकला धडक दिली आणि हा अपघात घडला. अपघाताच्या आवाजाने परिसरत दणाणून गेला. त्यामुळे स्थानिकांना घटनेची माहिती कळाली. स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरु केले. तसेच, पोलिसांनाही घटनेबाबत कळवले.

प्राप्त माहितीनुसार, टायर फुटल्याने एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. याच वेळी प्रवाशांनी भरलेली एक बस भरधाव वेगाने येत होती. बस चालकाला उभ्या असलेल्या ट्रकचा पुरेसा अंदाज आला नाही. परिणामी ही बस भरधाव वेगातच जाऊन ट्रकला आदळली. हा अपघात दौंड तालुक्याच्या वाखारी गाव हद्दीत घडला. (हेही वाचा, Local Train Accident: पालघरमध्ये हायड्रा क्रेनची लोकल ट्रेनला धडक; मोटरमन गंभीर जखमी)

दरम्यान, अपघातात बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बस एका बजूने चक्काचूर झाली. उभ्या असलेल्या ट्रकचेही मोठे नुकसान झाले. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.