Datta Kaka Sane Passes Away: NCP नगरसेवक दत्ता काका साने यांचे निधन; सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे यांनी वाहिली श्रद्धांजली (See Tweet)
Datta Kaka Sane | (PC -Facebook)

Datta Kaka Sane: पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri‑Chinchwad Municipal Corporation) राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नगरसेवक दत्ता साने (Datta Sane) यांचे निधन झाले आहे.  त्यांची कोरोना व्हायरस (Coronavirus) चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. हे वृत्त समजताच राष्ट्रवादी काँग्रेस नेते दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुद्धा ट्विट करून दुःख व्यक्त केले आहे. या कठीण प्रसंगी साने यांच्या कुटुंबीय व समर्थकांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत त्यांना लवकरच या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना सुद्धा या ट्विट मधून करण्यात आली आहे. Datta Sane Passes Away: दत्ता साने यांच्या निधनानंतर चिखली-मोरेवस्ती परिसरात दु:खाचे सावट

दत्तात्रय बाबुराव साने, हे दत्ता काका साने या नावाने ओळखले जायचे. चिखली-मोरेवस्ती परिसरातून नगरसेवक होते. या परिसरातून ते सलग 3 वेळा निवडून आले होते. 25 जून रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती चिंचवड येथील हॉस्पिटल मध्ये त्यांच्या वर उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झाले.

सुप्रिया सुळे ट्विट

दिलीप वळसे पाटील ट्विट

राजेश टोपे ट्विट

काही दिवसांपूर्वी, ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे नगरसेवक मुकुंद केणी यांचे सुद्धा कोरोनामुळे निधन झाले होते. त्यापूर्वी शिवसेना नगरसेवक हरिश्चंद्र आमगावकर यांचेही कोरोना व्हायरस संसर्गामुळे निधन झाल्याचे सुद्धा वृत्त समोर आले होते. कोरोना मुळे आतापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांचा बळी गेला आहे.