अनिल परब (Anil Parab) यांचे व्यावसायिक भागिदार आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना 14 दिवसांची ईडी कोठडी (Sadanand Kadam In ED Custody) मिळाली आहे. कदम यांना सुमारे चार तास कसून चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने (Enforcement Directorate) अटक केली होती. अटकेनंत त्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या वेळी झालेल्या युक्तीवादात सदानंद कदम यांनी चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे दिली नसल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यानंतर कोर्टाने ईडीचा युक्तीवाद मान्य करत 14 दिवसांची कोठडी मान्य केली.
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी इडीने सदानंद कदम यांना अटक केली आहे. प्रकरण गुंतागुंतीचे आहे. आरोप आहे की, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमीनिवीर तीन मजली रिसॉर्ट बेकायदेशीररित्या उभारले. भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा आरोप केला होता. त्यांनी इडीकडे तशी तक्रारही दिलीहोती. दरम्यान, इडीनेही तत्काळ चौकशी करत अनिल परब आणि सदानंद कदम यांना नोटीस पाठवली. अनिल कदम आणि सदानंद कदम यांचे संबंधही चौकशीदरम्यानच पुढे आले. (हेही वाचा, ED Detains Sadanand Kadam: रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम ईडीच्या ताब्यात; दापोलीच्या साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीची कारवाई)
सदानंद कदम यांना ईडीने शुक्रवारी चौकशीसाठी बोलावले. त्यांची चार तास चौकशी केल्यावर ईडीने त्यांना अटक केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या अटकेची शक्यता या आधीच व्यक्त केली होती. याशिवाय आक्रमक भूमिका घेत पुढचा क्रमांक आता अनिल परब यांचा असणार आहे. अनिल परब यांनी बॅग भरुन तयार राहावे, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. किरीट सोमय्या सातत्याने अनिल परब यांच्यावर निशाणा साधत आले आहेत. या आधी त्यांनी दापोली येथील साई रिसॉर्टही तोडण्यासाठी एक मोठा हातोडा हातात घेतल्याचा प्रतिकात्मक व्हिडिओही बनवला होता.
ट्विट
#UPDATE | Former Maharashtra minister Anil Parab's business partner, Sadanand Kadam remanded to ED custody till March 15.
— ANI (@ANI) March 11, 2023
दरम्यान, अनिल परब यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटी रुपयांचा मानहानिचा दावा दाखल केला आहे. याशिवाय सोमय्या यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्तावही सादर केला आहे. त्यावर आता काय कारवाई होते याबाबत उत्सुकता आहे.