रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली (Dapoli) मध्ये साई रिसॉर्टच्या कथित घोटाळा (Sai Resort Scam) प्रकरणी ईडी कडून आज (10 मार्च) अजून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय आणि रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त ABP Majha ने दिले आहे. सदानंद कदम यांना खेड (Khed) मधील त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन करून मुंबईकडे आणले जात आहे.
दरम्यान सदानंद कदम यांना काही महिन्यांपूर्वी याच प्रकरणामध्ये ईडीने समन्स देखील बजावला होता. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. परब यांनी फसवणूक करून दापोली तालुक्यात एक आलिशान रिसॉर्ट बांधल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांच्या दाव्यानुसार, अनिल परब यांनी 2017 मध्ये हा भूखंड खरेदी केला होता आणि कोरोनाच्या काळात या शेतजमिनीवर रिसॉर्ट बांधण्याचे काम करण्यात आले होते. या जमिनीची 2019 मध्ये नोंदणी झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2020 मध्ये ही जमीन रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना 1.10 कोटींना विकली गेली आहे.
#Dapoli #SaiResort Scam #SadanandKadam Arrested (Anil Parab's Partner)
ab
Kya Hoga Tera #anilparab @BJP4India @Dev_Fadnavis @mieknathshinde
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 10, 2023
रामदास कदम आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद असले तरीही सदानंद कदम उद्धव ठाकरे गटाशी जवळीक साधून आहेत. मागील आठवड्यात खेड मध्ये झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये सदानंद कदम यांच्या कुटुंबाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला होता.