Dahi Handi Festival 2020: कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाचे सावट यंदा राज्यातील सर्व सण उत्सवांवर पडले आहे. त्यामुळे आगामी गणेशोत्सव (Ganesh Festival 2020), दहीहंडी (Dahi Handi Festival) उत्सव आदी सोहळे रद्द करण्याचा निर्णय शासन आणि या सोहळ्यांच्या आयोजक मंडळांनी घेतला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणासे साजरा होणार आहे. तर, दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामळे यंदा डॉल्बीच्या तालावर गोंविंदांची थरांवर थर अशी दिसणारी थरथर दिसणार नाही. दहीहंडी समन्वय समितीने जाहीर केलेल्या निर्णयानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सव होणार नाही.
दहीहंडी उत्सव साजरा करताना दरवर्षीच अनेक प्रश्न चर्चेला येतात. दहीहंडी किती मोठी असावी. इतक्या मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी करताना गोविंदांचे थर लावावेतच का वैगेरे वैगेरे. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे सर्वच प्रश्न निकाली निघाले आहेत. कारण, यंदा दहीहंडी उत्सव सोहळाच साजरा होणार नाही. मुंबईत एक दोन नव्हे तब्बल 15 हजारांहून अधिक दहीहंडी मंडळे आहेत. त्यातील कोणत्याच मंडळाने अद्याप दहीहंडी उत्सव प्रशिक्षणास सुरुवात केली नाही. (हेही वाचा, Ganeshotsav 2020: गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना गणेश मंडळांना मान्य)
गणेशोत्सव, दहीहंडी हे सर्व उत्सव गर्दी जमा करणारे उत्सव आहेत. त्यामुळे गर्दी नसेल तर हे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा येतात. गणेशोत्सवाचे एक वेळ ठिक आहे. तो घराघरांमध्ये साजरा केला जाऊ शकतो. मात्र, दहीहंडी उत्सव साजरा करायचा तर मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथके येतात. या पथकातील गोविंदा एकमेकांच्या खांद्याला खांदा लाऊन दहीहंडी फोडतात. ही दहीहंडी फोडण्यासाठी गर्दीही तितकीच प्रचंड असते. अशा वेळी प्रेक्षकांची गर्दीही प्रचंड असते. त्यामुळे अशा वेळी कोरोना व्हायरस संक्रमन वाढण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.