Dadar Crime: खळबळजनक! प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराचा प्रेयसीवर जीवघेणा हल्ला; दादर येथील धक्कादायक घटना
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

प्रेमसंबंध तोडले म्हणून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) दादर (Dadar) परिसरात 13 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर दादर परिसरात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी दादर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत प्रेयसी जखमी झाली असून जवळच्या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहे, अशी माहिती दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिवाकर शेळके यांनी दिली आहे.

तेजस कमलाकर खोबरेकर (वय, 28) असे आरोपीचे नाव आहे. तेजस हा दादरमधील आगर बाजार येथील रहिवाशी असून तो टॅक्सी चालक आहे. याच परिसरात राहाणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. मात्र,कालांतरींनी दोघांचे नाते तुटले. या विषायावरच बोलण्यासाठी तेजसने शुक्रवारी (13 नोव्हेंबर) रात्री 11.10 च्या सुमारास संबंधित तरुणीला आगार बाजार येथील चंद्रकांत धुरू वाडी येथे बोलावून घेतले. त्यावेळी दोघात वाद झाला. याच वादातून तेजसने तरूणीच्या गळ्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर तेजसने तेथून पळ काढला. त्यानंतर या घटनेची माहिती होताच दादर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तरुणीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल केले. हे देखील वाचा- Thane: चारित्र्याच्या संशायवरुन बायकोची हत्या, नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला. मात्र. तो फरार झाल्याचे पोलिसांना कळाले. याच दरम्यान, आरोपी हा किर्ती महाविद्यालयात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेजसला अटक केली. त्याच्या विरुद्ध भारतीय दंड विधयक अनुच्छेद 307, 323, 506, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.