Cyclone Fani. (Photo Credits: ANI)

Cyclone Fani Update: आज सकाळी ओडिशाच्या किनार्‍यावर फनी वादळ (Cyclone Fani) धडकलं. त्यानंतर त्याचा वेग थोडा मंदावला असला तरी बंगालच्या दिशेने वादळ कूच करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कोलकत्ता विमानतळ (Kolkata Airport) बंद ठेवले जाणार आहे. अशी माहिती Airports Authority of India देण्यात आली आहे. Cyclone Fani: फनी चक्रीवादळ ओडिशा राज्याच्या सीमेवर, गृह मंत्रालयाकडून 1938 हा हेल्पलाइन क्रमांक जारी

कोलकत्ता विमानतळ बंद

आज (3 मे) दुपारी 3 वाजल्यापासून उद्या (4 मे) सकाळी 8 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार आहे. यापूर्वी आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच विमान बंद राहील असे सांगण्यात आले होते. Fani Cyclone: 'ओडिशा' ला धडकणारं चक्रीवादळ 'फनी' याचं नावं कसं ठरलं? त्याचा नेमका अर्थ काय?

विशाखापट्टणम - मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेन

विशाखापट्टणम ते मुंबई सीएसएमटी ही विशेष ट्रेन कोणार्क एक्सप्रेसच्या वेळापत्रकानुसार चालवली जाणार आहे.

फनी वादळामध्ये सुमारे 11 लाख लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. पर्यटकांनाही समुद्र किनार्‍यांपासून दूर राहण्याचा सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशाच्या आजच्या वादळाच्या तडाख्यात अनेक ठिकाणी पाऊस, वारा यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत.