Cyber Crime: ट्रेनचं ऑनलाईन  तिकीट काढण्याच्या नादात व्यावसायिकाने गमावले दीड लाख
Cyber Crime | Representational Image (Photo Credits: Pixabay)

तंत्रज्ञान जसं प्रगत झाले आहे तसे सायबर क्राईम मध्येही लोकांना गंडवण्याचे नवनवे मार्ग समोर आले आहेत. मुंबईच्या बोरिवली भागामध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. एका कपडे विक्रेत्याची दीड लाखांची फसवणूक झाली आहे. ट्रेनचं तिकीटबूक करताना त्याची ही फसवणूक झाली आहे. यामध्ये फसवणूक करणार्‍याने अ‍ॅप्स किंवा लिंक्सचा वापर केलेला नाही.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तक्रारदाराने आपल्याला कुटुंबासोबत रेल्वेप्रवासासाठी तिकीट बुकिंग करायची असल्याने एक अ‍ॅप डाऊनलोड केल्याचं म्हटलं. पालक, बहिण, पत्नीचं मुंबई ते अमृतसर प्रवासाचे 20 हजार रूपये झाले. पण तिकीट बूक झाल्यानंतर सीट नंबरचं नोटिफिकेशन आलं नाही. त्यामुळे अ‍ॅपवरच त्याने इतर पर्यायांसाठी शोधाशोध केली.

एका कस्टमरनंबर पर्यंत पोहचल्यानंतर त्याने 6 मार्चला त्याने त्यावर कॉल केला. एका सिनियर एक्झिक्युटिव्ह सोबत संपर्क झाल्यानंतर त्याने 'customer support' आणि 'sms forward'अ‍ॅप डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला.

तक्रारदाराने देखील सार्‍या स्टेप्स फॉलो केल्या. अ‍ॅप वर त्याने डेबिट कार्ड स्कॅन केले. त्यानंतर पॉप अप झालेल्या लिंक वर क्लिक केले. त्यानंतर त्याला वेब पेज वर रिडिरेक्ट करण्यात आले. तेथे युजर आयडी, पासवर्ड टाकून पिन नंबर टाकून सारे व्यवहार पूर्ण करण्यात आले. या व्यवहारानंतर त्यांच्या अकाऊंट मधून 40 हजार रूपये गेले. फसवणूक करणार्‍याने त्याला पैशांचे रिफंड मिळेल. कंफर्म तिकीटही मिळेल असे आश्वासन दिले. त्यासाठी वेळच्या वेळी इमेल तपासत रहा असा सल्ला दिला.

कालांतराने काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्याचे एकूण 1.15 लाखाचे नुकसान झाल्याचं समोर आले. दरम्यान यामध्ये त्याने पोलिसात तक्रार नोंदवली असून तपास सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे.