नांदेड (Nanded) येथील एका बायोटेक कंपनीने कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) साठी 'कोविशिल्ड' (Covishield) ट्रेडमार्क वापरल्याबद्दल पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाविरूद्ध (Serum Institute of India) खटला दाखल केला आहे. CUTIS Biotech असे तक्रार दाखल करणाऱ्या कंपनीनचे नाव असून एप्रिल 2020 मध्ये त्यांच्या प्रॉडक्टचे रजिस्ट्रेशन कोविशिल्ड या नावाने केले होते, असे कंपनीचे म्हणणे आहे. (Bharat Biotech-Serum Institute Joint Statement : भारत बायोटेक, सीरम इन्स्टिट्यूट यांच्यातील भांडण मिटले; संयुक्त पत्रकाद्वारे वादावर पडदा)
ट्रेंडमार्क कोविशिल्ड प्रॉडक्टचे टनओव्हर 30 मे ते 31 डिसेंबर या कालावधीत सुमारे 16 लाख इतके होते. दरम्यान, सीरम इंस्टिट्युड ऑफ इंडियाने आमच्यानंतर म्हणजेच जून 2020 मध्ये ट्रेंडमार्कसाठी रजिस्ट्रेशन पाठवले, असा दावा CUTIS Biotech ने केला आहे.
सुरुवातीला हा खटला नांदेड मधील स्थानिक कोर्टात दाखल करण्यात आला होता. मात्र सीरम इंस्टिट्युटने हा खटला स्थानिक न्यायालयाच्या हद्दीत येत नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर हा खटला पुण्यातील कर्मिशियल कोर्टात दाखल करण्यात आला आहे. 19 जानेवारी रोजी या खटल्याची सुनावणी होणार आहे.
CUTIS Biotech ने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले की, सीरम इंडस्टिट्यूटच्या खूप आधी त्यांनी ट्रेंडमार्कसाठी अप्लाय केले होते. त्यामुळे ते ट्रेंडमार्क त्यांनाच देण्यात यावे, या ट्रेंडमार्कच्या गोंधळामुळे बायोटेक्सच्या क्लाईंटने रद्द केलेल्या ऑडर्सची नुकसान भरपाई सुद्धा देण्यात यावी.
प्रॉडक्टच्या नावाच्या गोंधळामुळे भरपून संस्थांनी ऑर्डर नाकारल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. Drugs Controller General of India ने कोविशिल्डच्या आत्पातकालीन वापरासाठी परवानगी दिली असून ही लस अॅस्ट्रॅजेनेका आणि ऑक्सफोर्ड यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे.
दरम्यान, देशात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इंस्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आत्पातकालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. लवकरच पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता असून आरोग्यसेवक आणि कोरोना योद्धा यांना मोफत लस दिली जाणार आहे.