Mumbai Local | (Photo Credit - Twitter)

सीएसएमटी (CSMT ) स्थानकातील फलाट क्रमांक एकवर झालेल्या अपघातामुळे (CSMT Harbour Line Train Accident) विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत झाली आहे. फलाट क्रमांक एकवर रुळावरुन घसरलेला मुंबई लोकलचा डबा पुन्हा रुळावर आणण्यात आला. त्यामुळे बराच काळ ठप्प झालेली फलाट क्रमांक एकवरुन हार्बर (CSMT Harbour Line) मार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली आहे. परिणामी हार्बर मार्गावरील खोळंबलेली वाहूतूकही पूर्ववत झाली. मध्य रेल्वेने एक व्हिडिओ शेअर करत ट्विटरद्वारे ही माहिती दिली. सकाळी 9.39 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुढे जाण्या ऐवजी पाठिमागे आली आणि ती बफरला धडकली. त्यामुळे डबा रुळावरुन घसरुन तो फलाटवर आला आणि वाहतूक खोळंबली होती.

नेमके काय घडले?

मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.39 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुढे जाणे अपेक्षीत होते. मात्र, ती लोकल पुढे जाण्याऐवजी पाठिमागे आली. पाठिमागे येऊन ही लोकल बफरला धडकली. त्यामुळे या लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा काहीशी विस्कळीत झाली. (हेही वाचा, CSMT Harbour Line Train Accident: सीएसएमटी येथे मुंबई लोकलला अपघात, बफरला धडकल्याने रुळावरुन घसरलेला डबा फलाटावर, हार्बर रेल्वे सेवा विस्कळीत)

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलला अपघात झाला. त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीवरुन फलाट क्रमांक एकवरुन पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल बफरला धडकली. त्यामुळे एक डबा रुळवरुन घसरला. हा डबा पुन्हा रुळावर आणे पर्यंत या उलाटावरुन कोणतीही वाहतूक सुरु राहणार नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून ती धिम्या गतीने सुरु आहे.