मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे (CSMT Harbour Line) मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलला अपघात (CSMT Harbour Line Train Accident) झाला. त्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसएमटीवरुन (CSMT ) फलाट क्रमांक एकवरुन पनवेलच्या दिशेने जाणारी लोकल बफरला धडकली. त्यामुळे एक डबा रुळवरुन घसरला. हा डबा पुन्हा रुळावर आणे पर्यंत या उलाटावरुन कोणतीही वाहतूक सुरु राहणार नाही. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून ती धिम्या गतीने सुरु आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य प्रवक्ते शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.39 वाजता सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर पुढे जाणे अपेक्षीत होते. मात्र, ती लोकल पुढे जाण्याऐवजी पाठिमागे आली. पाठिमागे येऊन ही लोकल बफरला धडकली. त्यामुळे या लोकलचा एक डबा रुळावरुन घसरला. त्यामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक सेवा काहीशी विस्कळीत झाली आहे. मात्र, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची वाहूतूक सेवा पूर्ववत सुरु आहे. तिला कोणतीही बाधा झाली नाही.
ट्विट
Important for Harbor line commuters!@drmmumbaicr pic.twitter.com/z4B5sg1gML
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 26, 2022
ट्विट
#Mumbai Harbour line alert. Derailment at Mumbai CSMT @mid_day pic.twitter.com/0WbRdaaryb
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) July 26, 2022
शिवाजी सुतार यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सीएसएमटी स्थानकात हार्बर रेल्वे सेवेसाठी दोन फलाट आहेत. त्यापैकी फलाट क्रमांक एकवर ही घटना घडली. प्रशासनाने घटनेची नोंद घेतली आहे. डबा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. फलाट क्रमांक दोनवरुन वाहतूक सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतू, ही वाहतूक काहीशी धिम्या गतीने सुरु आहे. वाहतूकीवर अधिक ताण येऊ नये यासाठी इतरही रेल्वे स्टेशनवरुन वाहतूक नियमीत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सुदार यांनी सांगितले.