Crimes Against Women: देशातील विविध राज्यात अद्याप महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नावच घेत नाही आहे. तर नुकत्याच आता एनआरसीबीकडून (National Crime Records Bureau) 2019 या वर्षातील महिलांवरील अत्याचार झाल्याची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार 2019 मध्ये मुंबईत (Mumbai) 6519 प्रकरणे आणि दिल्लीत (Delhi) 12,902 प्रकरणे उघडकीस आली आहेत. तर महाराष्ट्रात 1.5 टक्क्यांनी महिलांवरील अत्याच्याराचा घटनेत घट झाली आहे. तसेच 2019 या वर्षात 3.51 लाख महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. जी मागील वर्षात 3.46 लाख ऐवढी होती.(Sub Inspector Sandeep Dahiya Arrested: प्रियसीला गोळी मारल्यानंतर सासऱ्यांची हत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिया ला अटक)
AIR यांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआरसीबीच्या महिलांच्या अत्याचाराच्या डेटामधील आकडेवारीत असे दिसुन आले आहे की, मुंबईतील एकूणच महिलांवरील अत्याचाराची गेल्या दोन वर्षातील आकडेवारी ही अनुक्रमे 6058 आणि 5453 ऐवढी आहे. महिलांच्या मर्यादेचा अपान केल्याच्या बाबतीत शहर हे 575 व्या क्रमांकावर तर दिल्ली 456 ने दुसऱ्या क्रमांकावर आहे.(Wife Killed Husband: पॉर्न फिल्म बघून पत्नीचा लैगिंक छळ करणे पतीच्या जीवावर बेतले; पुणे येथील धक्कादायक घटना)
ऐवढेच नाही तर मुंबईत सार्वजनिक वाहतुकीच्या माध्यमातून सुद्धा लैंगिक शोषण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्याचसोबत चाईल्ड पॉर्नोग्राफीची आकडेवारी सुद्धा तितकीच भयंकर आहे. दिल्ली आणि जयपूर नंतर बलात्काराच्या घटनांमध्ये आर्थिक राजधानी देखील तिसऱ्या क्रमांकावर आहे. सायबर गुन्हांच्या संदर्भात एनआरसीबीच्या आकडेवारीत असे दिसले की, बंगळुरु नंतर मुंबईत सलग तिसऱ्या वर्षी देखील तिसऱ्या क्रमांकावर आहे. बंगळुरुत 10,555 प्रकरणे आणि मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांची 2527 ऐवढी नोंद आहे.