Sub Inspector Sandeep Dahiya Arrested: प्रियसीला गोळी मारल्यानंतर सासऱ्यांची हत्या करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिया ला अटक
Arrests | Image For Representation (Photo Credits: Pixabay)

Sub Inspector Sandeep Dahiya Arrested: दिल्लीतील अलीपुरमध्ये मैत्रिणीवर गोळी झाडून हरियाणाच्या रोहतक येथे आपल्या सासऱ्यांची हत्या करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक संदीप दहिया याला अखेर अटक करण्यात आली आहे. (Sub Inspector Sandeep Dahiya Arrested) संदीप दहिया याला पोलिसांच्या विशेष अधिकाऱ्यांनी अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीकडून गुन्ह्यांत वापरलेले हत्यार व वाहन जप्त करण्यात आले आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांनी माहिती दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी संदीप हा उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात आपल्या महिला सहकाऱ्यासोबत गेला होता. या ठिकाणी कोणत्यातरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे संदीपने कारमध्येचं आपल्या प्रियसीवर गोळीबार केला. या प्रकारानंतर तो घटनास्थळावरून पसार झाला होता. (हेही वाचा - मध्य प्रदेश: प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने IPS अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण)

या घटनेत गोळीबार करण्यात आलेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर आहे. यापूर्वी पोलिसांनी दिल्ली-एनसीआर पोलिसांना संदीप दहिया यांना अटक करण्याचा इशारा दिला होता. एनसीआरच्या डीसीपींसह दिल्लीतील सर्व जिल्ह्यांच्या पोलिस विभागांना यासाठी पत्र पाठविण्यात आलं होतं. त्यानुसार, आज संदिप दहियाला अटक करण्यात आली आहे.