
पुणे (Pune) शहरात एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape incident in Pune) झाल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. अवघ्या 20 रुपयांचे (Rupees) अमिष दाखवत नराधमाने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. धक्कादायक असे की, हे कृत्य करणारा नराधम पीडितेच्या शेजारीच राहतो. त्याने पीडितेला 20 रुपये देण्याचे आमिश दाखवून जवळ बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिच्यावर बलात्कार (Rape ) झाल्याचे पुढे आले आहे.
पीडितेच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, नराधम तरुणाने पीडितेला 20 रुपयांचे आमिष दाखवून बोलावले. तिच्यावर बलात्कार केला. हा नराधम तिच्यावर बलात्कार करुनच थांबला नाही. घडल्या प्रकाराची कुठे वाच्चता केल्यास त्याने तिला जीवे मारण्याची धमकीसुद्धा दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा सखोल तपासही सुरु केला आहे. (हेही वाचा, Shocking! पुण्यात अल्पवयीन मुलीवर भाऊ आणि वडिलांकडून 5 वर्षे बलात्कार; आजोबा व काकांनी केला विनयभंग)
आरोपीने ही घटना उघडकीस यायच्या आगोदरही पीडितेवर अनेक वेळा अत्याचार केला आहे. मयूर पांडुरंग फडक असे अत्याचाराचा आरोप असलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडितेच्या घरी कोणी नसल्याचे पाहून त्याने प्रथम तिचा विनयभंग केला आणि त्यानंतर बलात्कारही केला. धक्कादायक घटनेनंतर पीडिता प्रचंड घाबरली असून तिच्यावर समुपदेशन केले जात आहे.