Cyber Crime: गेल्या काही दिवसांपूर्वी एका तरुणाला पार्ट टाइम जॉबचं आमिष दाखवून त्याच्याकडून 61 लाख रुपये लुटले होते. ही घटना ताजी असताना दरम्यान एका प्रसिध्द क्रिकेटपटूच्या आईला या ऑनलाईन फसवणूकीला (Cyber Crime) सामना करावा लागला आहे. महिला क्रिकटेपटू पूनम राऊत (Poonam Raut) हिच्या आईची सायबर गुन्हेगाराद्वारा फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेअंतर्गत माहिम पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी सायबर फसवणूक अंतर्गत गुन्हा दाखल करून घेतला आहे. (हेही वाचा-पार्ट टाईम जॉबच्या आहारी गेलेल्या तरुणाला 61 लाखांचा गंडा,)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत पूनम यांच्या आईची फसवणूक केली. 9 डिसेंबर रोजी गीता राऊत यांना एक फोन आला. फोनवर त्यांना त्यांच्या पतीकडून घेतलेली कर्जाची रक्कम परत करणासंदर्भात बोलत होता. आरोपीने गीता कडून एक लाख रुपये लुटले. या घटनेची माहिती त्यांना समजताच माहिम पोलिस स्टेशन गाठलं. तक्रारीनंतर घटनेसंदर्भात गुन्हा दाखल करून घेतला. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, अमित कुमार असं नाव असलेल्या व्यक्तीने त्यांना फोन केला. तुमच्या पतीने मला १५ हजार रुपये कर्ज म्हणून दिले होते. असं सांगत ही रक्कम तुमच्या मोबाईलवरील गुगल पे द्वारे पाठवतो. त्यानंतर अमितने राऊत यांना त्यांच्या खात्यामध्ये आधी १० हजार दिले आणि मेसेज देखील आला, त्यानंतर काही वेळाने पुन्हा एक मेसेज राऊत यांच्या मोबाईलवर आला त्यात ५०,००० खात्यात जमा झाले अशी माहिती होती.
अमितने लगेच त्यांना फोन करून सांगितले की, माझे ५०,००० रुपये चुकून तुमच्या खात्यात जमा झाले. त्यांना फोनवरून विनंती करून माझे पैसे मला परत पाठवा असं सांगितले. फोनवर त्यांना गुंतवून त्याच्याकडून १ लाख रुपयांची फसवणूक केली. कालांतराने त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाली आहे समजले. माहिम पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दिली. पोलिसांनी या भामट्याला शोधणासाठी तपास सुरु केला आहे.