'स्मशानातील सोनं' ही साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची कथा अनेकांनी वाचली असेल. पाठ्यपुस्तकांमध्ये धडा म्हणूनही शिकवण्यात येत होती. हा धडा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे पंढरपूर येथे 'स्मशानातील राख' प्रकरण. होय, नागरिकांच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या अंतविधीदरम्यान सोन्याचा एकादा मणी, दागिना किंवा तशीच काहीतरी वस्तू अर्पण करण्याची परंपरा पूर्वंपार चालत आली आहे. अशा वेळी या सोन्याचीही हाव अनेकांना सुटली आहे. हे कृत्य करणारी एक टोळीच सक्रीय झाली आहे. जी स्मशनातील राख परस्परच गोळा करुन अस्थीसह चोरत आहे.
मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयात अंतिविधी करण्याचा इशारा
अंत्यविधीनंतर उरणारी राख चोरीला जात असल्याबद्दल नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, सामाजिक कार्यकर्ते या प्रकाराबद्दल प्रचंड आक्रमक झाले आहेत. हा प्रकार वेळीच बंद न झाल्यास यापुढे शहराच्या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच अंत्यविधी करण्याचा इशारा दिला आहे.
राखेसाठी अस्थींचीही चोरी
हिंदु धर्मामध्ये परंपरा आहे की, व्यक्तीच्या अंगावर असलेले सोने अंतविधीवेळी तसंच ठेवलं जातं. त्यामुळे हे सोनं राखेसोबत राहते. याच सोन्याची हाव सुटल्याने काही लोक थेच अस्थी आणि ही राखच घेऊन पसार होत आहेत. राखेतून सोनं काढणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करण्याची मागणी होत आहे. या टोळीने पंढरपूरात पाठिमागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे.
पंढरपूर येथे नागरिकांमध्ये संताप
पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या प्रभावती रामचंद्र कोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी (20 जुलै) रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर प्रभावती यांची राख आणण्यासाठी त्यांचे कुटुंबीय पोहोचले तेव्हा मात्र तिथे राखच नसल्याचे पुढे आले. त्यांनी आजूबाजूलाही पाहिले पण राख कोठेच दिसली नाही. त्यावरुन या राखेची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या आधीही असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे.