Coronavirus Update In Dharavi: धारावीत आज 23 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे धारावी परिसरातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 2,938 इतकी झाली आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे. मुंबई शहरामध्ये कोरोना रुग्णांचा आकडा वाढताना दिसून येत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु, गणेशोत्सवानंतर पुन्हा मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. मुंबईतील दादर, माहिम, धारावीमधील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे.
दरम्यान, रविवारी दादरमध्ये दिवसभरात 28 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे तेथील रुग्णांची संख्या 2,994 इतकी झाली आहे. यातील 465 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच माहीममध्ये 59 नवीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे माहीममधील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,708 इतकी झाली.(हेही वाचा -Coronavirus In Maharashtra Police: महाराष्ट्र पोलीस दलातील आणखी 311 जणांना कोरोनाची लागण तर 5 जणांचा गेल्या 24 तासात मृत्यू)
COVID-19 tally in Mumbai's slum colony Dharavi rises to 2,938 with addition of 23 new cases: BMC
— Press Trust of India (@PTI_News) September 14, 2020
याशिवाय रविवारी मुंबईमध्ये 2,085 नव्या कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. तसेच 41 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,69,693 इतकी झाली आहे. सध्या 30,271 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1,30,918 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुले त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.