Omicron Variant Cases in India: संपूर्ण भारतासह महाराष्ट्रातील ओमायक्रोन रुग्णांची संख्या घ्या जाणून
coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

देशभरात कोरोना व्हायरस ओमायक्रोन (Omicron) व्हेरीएंट संक्रमित रुग्णांची संख्या हळूहळू वाढत आहे. आज (रविवार, 12 डिसेंबर 2021) देशभरातील ओमायक्रोन संक्रमितांचा आकडा 38 वर (Omicron Variant Cases in India) पोहोचाला. अबु धाबीवरुन ब्रिटनमार्गे भारतात आलेला एक रुग्ण आणि नागपूरमध्ये दक्षिण अफ्रिकेतून दाखल झालेला एक रुग्ण या दोघांच्या समावेशानंतर हा आकडा 38 झाला. महाराष्ट्रासोबतच (Omicron Variant Cases in India) कर्नाटक, चंडीगढ आणि आंध्र प्रदेश राज्यांमध्येही ओमिक्रॉन (Omicron) रुग्ण आढळून आले आहेत. भारत सरकार राष्ट्रीय पातळीवर तर महाराष्ट्र सरकार राज्य पातळीवर कोरोना व्हायरस आणि नव्याने आलेल्या ओमायक्रोन (Omicron) व्हेरीएंट संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत प्रप्त माहितीनुसार, महाराष्ट्रात ओमायक्रॉन संक्रमित रुग्णांची संख्या 18 इतकी झाली आहे. यात प्रामुख्याने पिंपरी चिंचवड, मुंबई, पुणे, कल्याण-डोंबिवली आणि नागपूर शहरे आघडीवर आहेत. शहरनिहाय ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येचा विचार करायचा तर, मुंबई (5), पिंपरी चिंचवड (10), पुणे मनपा हद्द (1) , कल्याण-डोंबिवली (1) आणि नागपूर (1) अशी आकडेवारी आहे. नागपूरमध्ये आजच एक रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळला. दरम्यान, ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या जरी 18 झाली असली तरी त्यातील नऊ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची सख्या केवळ 9 राहिली आहे. ज्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली आहे त्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. (हेही वाचा, Omicron Variant: चंदीगड आणि आंध्र प्रदेशसह कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे तीन रुग्ण आढळले, रुग्णसंख्या 36 वर)

महाराष्ट्रात दिवसभरा  709 जण कोरोना संक्रमित

महाराष्ट्रात दिवसभरात 709 जण कोरोना संक्रमित झाले आहेत. तर 699 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 6,441 इतकी आहे. तर राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची संख्या 18 झाली आहे. त्यापैकी. मुंबई-5, पिंपरी चिंचवड - 10, कल्याण डोंबिवली -1, पुणे महापालिका हद्दीत-1 आणि नागपूर -1 रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान, चंडीगढ येथे एक 20 वर्षीय युवक ओमायक्रॉन संक्रमित आढळला आहे. तो इटलीवरुन आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होता. हा तरुण 22 नोव्हेंबर रोजी इटलीतून भारतात आला. त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला. विशेष म्हणजे या तरुणात ओमायक्रॉन अथवा कोविडचे कोणतेही लक्षण जाणवत नव्हते. या तरुणाने फायजर लस घेतली होती. तरिही तो ओमायक्रॉनबाधित आढळला. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्यातही ओमायक्रॉन संक्रमित व्यक्ती आयरलँडवरुन परतला आहे. या व्यक्तीच्या रुपात आंध्र प्रदेशामध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमध्येही ओमिक्रॉन चे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधीत रुग्ण आहेत.