Coronavirus in India (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रास देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सध्याची राज्यातील परिस्थिती अधिक भयंकर असून सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. महाराष्ट्रात नव्या 92 कोरोना रुग्णांची वाढ झाल्याने आकडा 1666 वर पोहचला आहे. लॉकडाउनच्या काळात विनाकारण रस्त्यावरुन फिरणाऱ्यांच्या विरोधात कठोर करवाई केली जात आहे. मात्र पोलिसांवर या काळात कामाचा अधिक भार आला असून वारंवार नागरिकांना लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चोप द्यावा लागत आहे. याच पार्श्वभुमीवर ठाणे येथील एका पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे.

पोलीस कर्मचारी कोरोनाच्या परिस्थितीत त्यांचे कर्तव्य दिवसरात्र पार पाडत आहेत. याच दरम्यान त्यांना सुद्धा कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. मात्र आता एका पोलीस कर्मचाऱ्याला त्याची लागण झाली असून त्याच्यावर नाशिक येथे उपचार करण्यात येत आहे. तर नागरिकांनी स्वत:साठी, कुटुंबासाठी घरीच थांबा असे ही आवाहन वारंवार करण्यात येत आहेत.(मुंबई: धारावी येथील नागरिकांची स्क्रिनिंगद्वारे करण्यात येणाऱ्या चाचणीला 150 डॉक्टरांच्या पथकाकडून आजपासून सुरुवात) 

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूची अधिकाधिक प्रकरणे समोर येत असल्याने लॉकडाउन अजून 15 दिवसांसाठी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या संबंधित मोठी घोषणा करतील असे ही बोलले जात आहे. त्यामुळे राज्याच्या लॉकडाउन संबंधित काय निर्णय घेतला जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.