देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे सर्व क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. मात्र कोरोनाची परिस्थिती पाहता सरकारने लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधांसाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच सरकारकडून सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची मुभा नाही आहे. परंतु खरंच गरज असल्यास पोलिसांकडून त्या संदर्भातील पत्र असणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबई येथून सांगलीत आणण्यात आलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर स्थानिक प्रशासनाला ही गोष्ट कळताच त्यांना धक्का बसला आणि या संदर्भात अधिक तपास करण्यास सांगितला.
निगडी येथील कॅन्सर उपचारासाठी चुलतीला घेऊन आलेल्या काहींना पोलिसांकडून पास देण्यात आले होते. चुलतीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर अन्यजण पुन्हा गावी परतत होते. त्यावेळी निगडीतील सदर तरुणी आणि तिच्या भावाने या लोकांसोबत गाडीतून प्रवास केला. त्यानंतर गुरुवारी तरुणीत कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिला आणि भावाला क्वारंटाइन करण्यात आले. तर 24 एप्रिलला तरुणीची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे दिसून आले. त्यामुळे तरुणी आणि भाऊ मुंबईतून पुन्हा सांगलीत कसे आले याचा तपास करण्यात आला. तपासाअंती असे समोर आले की, निगडीहून मुंबईत गेलेल्या काहींनी त्या दोघांना येथे आणले होते. यावर पोलिसांनी तरुणी, तिच्या भावासह अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच कोरोनाबाधित कुटुंबसोबत 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.(Lockdown: महाराष्ट्र सरकार, महापालिका निर्णाची वाट पाहा, आदेश येईपर्यंत दुकानं उघडू नका- FRTWA)