कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत 100हून अधिक रुग्ण आढळले असून एकट्या महाराष्ट्रात 39 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 39 वर पोहचला आहे. यात महाराष्ट्रातील पुणे (Pune) जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. शाळा, महाविद्यालय, व्यायाम शाळा, जलरतण तलाव, सिनेमागृहानंतर आता पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानांनाही (Jewelery Shops) टाळे लागणार आहे. पुढील 3 दिवस पुण्यात ज्वेलर्सची दुकाने बंद राहणार अशी माहिती, सराफ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फक्तेचंद रांका यांनी प्रसार माध्यामांना दिली आहे. पुण्यात कोरोना व्हायसचा संसर्ग वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत जगभरात 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. आता भारतातही कोरोना व्हायरसने प्रवेश केला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानांना पुढील 3 दिवस बंद राहणार आहे. नुकतीच फत्तेचंद रांका यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. दरम्यान ते म्हणाले की, पुण्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी पुण्यातील 82 विविध व्यापारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या व्यापारी महासंघाने मंगळवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वप्रकारचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पुणे सराफ असोसिएशनने देखील शहरातील ज्वेलर्सची 19 शोरुम्स आणि लहान-मोठे 1 हजार 100 दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्यातील 17, 18, 19 तारखेला ज्वेलर्सची दुकाने बंद राहणार आहेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुढील काळात दुकाने बंद ठेवायची की सुरु ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असेही फक्तेचंद रांका म्हणाले आहेत. हे देखील वाचा- तुमचे घर सुरक्षित ठेवा! कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून नागरिकांना आवाहन
महाराष्ट्रात सध्या 39 कोरोनाग्रस्त रूग्ण आहेत. यवतमाळमध्ये 3 नवी मुंबई 3 मध्ये 1, पिंपरी चिंचवड मध्ये 9, पुणे मध्ये 7, मुंबई मध्ये 6, नागपूर मध्ये 4, कल्याणमध्ये 3, औरंगाबाद व अहमदनगर, रायगड, ठाणे मध्ये प्रत्येकी 1 रूग्ण आहेत. कोरोना व्हायरसग्रस्तांची पुणे, पिंपरी चिंचवड शहरातील वाढती संख्या पाहता आता नागरिकांना आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान या स्थितीमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आगामी तीन दिवसांसाठी पुणे शहरातील सारे बाजार व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. 17,18,19 मार्च या तीन दिवसांसाठी घाऊक आणि किरकोळ व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे सुमारे 40 हजार दुकाने बंद राहणार आहेत. यामध्ये किराणा माल आणि मेडिकल स्टोअर्स यांचा समावेश नसेल.