कोरोना व्हायरसने (Coronavirus) भारतातही धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात आतापर्यंत 100हून अधिक रुग्ण आढळले असून एकट्या महाराष्ट्रात 39 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 39 वर पोहचला आहे. यात कोरोनामुळे मुंबई येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडून नागरिकांनी सतत सावधान राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यातच राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीटरच्या माध्यामातून नागरिकांना महत्वपूर्ण सल्ला दिला आहे. कोरोनापासून बचावासाठी नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे, याची माहिती फोटोच्या माध्यमातून त्यांनी दिली होती.
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत जगभरात 6 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. यामुळे सर्वत्र भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनीही आपल्या ट्विटरच्या खात्यावरून नागरिकांना सुरक्षा बाळगण्याचे आवाहन केले आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्रात फोडाफोडीचा 'विषाणू' नाकाम ठरला; मध्य प्रदेशातील राजकीय पार्श्वभूमीवर शिवसेनाचा भाजपला टोला
सुप्रिया सुळे यांचे ट्वीट-
तुमचं घर सुरक्षित ठेवा!
Keep your home safe!#LetsFightCorona#CoronaVirusUpdates pic.twitter.com/Q2Ld4Hss2Z
— Supriya Sule (@supriya_sule) March 17, 2020
कोरोनाशी लढण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी नागरिकांना दिलेला सल्ला-
- प्रत्येकाने ठराविक वेळेनंतर हात स्वच्छ धुवावे.
- चेहऱ्याला वारंवार स्पर्श करणे टाळावे, खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा.
- दरवाजाच्या कड्या, टेबल आणि हॅंडरेल स्वच्छ ठेवावे.
- घराच्या खिडक्या उघड्या ठेवा किंवा एसी त्यानुसार ठेवावे.
ज्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती आहेत, त्यांनी काय करावे?
- ज्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती आहेत त्यांची स्वच्छता राखा. तसेच त्यांची काळजी घेण्याऱ्यांनीही वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
- जर शक्य असेल तर, त्यांना सुरक्षित जागी हलवावे.
- घरातील सदस्यांनी स्वच्छतेचे काटेकोर पालन करावे.
ज्यांच्या घरात आजारी व्यक्ती आहेत, त्यांनी काय करावे?
- आजारी व्यक्तींना वेगळी खोली द्यावी.
- एकाच व्यक्तीने त्यांची काळजी घ्यावी.
- 65 वर्षापेक्षा अधिक वयाचे असणाऱ्या रुग्णांची योग्य ती काळजी घ्यावी.
सुरुवातीला केवळ चीन मध्ये दाखल झालेला कोरोना व्हायरसने जगभरातील 70 हून अधिक देशांच्या चिंतेत वाढ केली आहे. यामुळे कोरोनापासून कसा बचाव करता, असा प्रश्न अनेक देशांसमोर पडला आहे. यातच राजेश टोपे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कोरोनासंबंधित माहिती दिली. पिंपरी चिंचवड- 9, पुणे- 7, मुंबई- 6, नागपूर- 4, यवतमाळ- 3, कल्याण- 3, नवी मुंबई- 3, राजगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबाद या सर्व जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आल्याची माहिती टोपे यांनी दिली होती. यातच मुंबई येथील आज एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.