Shiv Sena | (Photo credit: Archived, edited, representative images)

गुजरातपासून झारखंडपर्यंत कर्नाटकपासून इतर अनेक राज्यांत फोडाफोडीचा राजकीय व्हायरस धुमाकूळ घालत आहे. मात्र, महाराष्ट्रात फोटोफोडाचा हा 'विषाणू' नाकाम ठरला, असा टोला शिवसेना (Shiv Sena) मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दै. सामना (Dainik Saamana) संपादकीयातून भाजपला लगावण्यात आला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेश राज्यात सुरु झालेल्या राजकीय नाट्यावर 'सस्पेन्स कायम' या मथळ्याखाली संपादकीय लिहिण्यात आले आहे. या संपादकीयात भाजप आणि नेतृत्वावर जोरदार टीका करण्यात आली आहे.

सामा संपादकीयात म्हटले आहे की, संपूर्ण देशा सध्या कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरु आहे. अर्थात मध्य प्रदेशात सोमावीर जे राजकीय नाट्य घडले, तेदेखील कुठल्या विषाणूपेक्षा कमी नाही.सध्या विरोधी पक्षांची सरकारे खिळखिली करण्याच्या, ती पाडण्याच्या 'राजकीय विषाणू'ने देखील देशात धुमाखूळच घातला आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये त्याचा 'असर' दिसला आहे. हा 'विषाणू' नाकाम ठरला तो फक्त महाराष्ट्रातच. येथे हा व्हायरस चालला नाही आणि त्यांच्यावरच तो उलटला. महाराष्ट्रात शिवसेनेसबोत सरकार स्थान करता येत नाही याची खात्री पटताच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीलराष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याच प्रयत्न झाला. मात्र तो प्रयत्नही फसला. तरीही सरकार पाडण्याचा किडा वळवळच राहिला. केंद्रातील हाच 'प्रयोग' मध्य प्रदेशात सुरु केला आहे. (हेही वाचा, मध्य प्रदेश: कोरोनाच्या भीतीने मुख्यमंत्री कमलनाथ सरकारची बहुमत चाचणी टळली; भाजपची सुप्रीम कोर्टात धाव)

मध्य प्रदेशात 'कर्नाटक' घडते की 'महाराष्ट्र' हे पुढील घडामोडींवर घडेल. कोण कोणत्या चाली खेळतो, त्यात कोणाला किती यश मिळते, या चाली यशस्वी होतात की उलटतात यावर बरेच काही अवलंबून असेल. गुजरातपासून झारखंडपर्यंत, कर्नाटकपासून इतर अनेक राज्यांत हा फोडाफोडीचा व्हारस धुमाकळू घालत आहे पक्षांतरबंदी कायद्याच्या अशा चिंधड्या कोणत्याच देशात एवढ्या उडाल्या नसतील. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे आमदार तसेच गुजरातमधील चार आमदार यांची काय किंमत भाजपने मोजली हे जनतेला समजायला हवे, असेही सामना संपादकीयात म्हटले आहे.