Coronavirus: कोरोनाविरोधात लस येईपर्यंत 'मास्क' हीच आपल्यासाठी लस; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य
CM Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

कोरोनाने ( Coronavirus) महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला हादरुन सोडले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. मात्र, अद्यापही कोरोनावर औषध सापडले नाही. यामुळे कोरोनाविरोधात लस येईपर्यंत मास्क हिच आपली लस आहे, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वक्तव्य केले आहे. कोरोनाविरोधातला लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही. यामुळे राज्यातील नागरिकांनी मास्क आणि समाजिक अंतर ठेवण्याची शप्पथ घेणे आवश्यक आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

कोरोनाविरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आला आहे. लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येवू द्यायची नाही यासाठी MAH अर्थात मास्क, अंतर व हातांची स्वच्छता अशी “मां कसम” सर्वांनी घ्यावी असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी घेतले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 15 लाख 86 हजार 321 आहे. त्यात 13 लाख 38 हजार 606 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 85 हजार 270 करोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 41 हजार 965 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- मुंबई: Central Railway मार्गावर आणखी 225 लोकल येत्या सोमवार पासून धावणार

ट्विट-

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील वैज्ञानिकांनी एक नवीन तंत्र विकसित केले आहे. याचा वापर करून कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखता येऊ शकतो. या नवीन तंत्रामुळे कोरोनाचा प्रसार करणारे खास ब्लॉक करता येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.