मुंबई: Central Railway मार्गावर आणखी 225 लोकल येत्या सोमवार पासून धावणार
Mumbai local | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरसचे (Coronavirus) संकट अद्याप कायम आहे. मात्र अनलॉकिंग नुसार काही गोष्टी सुरु केल्या जात आहेत. पण अजूनही लोकल सामान्य व्यक्तींसाठी सुरु केलेल्या नाहीत. या मधून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली गेली आहे. याच दरम्यान आता येत्या सोमवार पासून मध्य रेल्वे मार्गावर (Central Railway Line) आणखी 225 लोकल धावणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर एकूण 706 लोकल या प्रतिदिनी चालवल्या जाणार आहेत. तसेच पश्चिम रेल्वे मार्गावर गेल्या आठवड्यापासून 700 लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. परंतु प्रवासावेळी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करावे अशा सुचना नागरिकांना दिल्या गेल्या आहेत.

मध्य रेल्वेचे पब्लिक रिलेशन्स ऑफिसर शिवाजी सुतार यांनी असे म्हटले आहे की, आम्ही 481 सेवा सुरु केल्या आहेत. त्यामुळे त्यात आता आणखी भर पडून त्यांची एकूण संख्या 706 ऐवढी सोमवार पासून होणार आहे. त्यापैकी 499 या मुख्य मार्गावर, 309 धीम्या मार्गावर आणि 190 फास्ट मार्गावर धावणार आहेत. तसेच हार्बर लाइनवर 187 आणि ट्रान्स हार्बर मार्गावर 20 लोकल धावणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणजे केंद्र सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, कॉर्पोरेट बँकिंग आणि पोर्ट कर्मचाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी आहे.(Maharashtra Mission Begin Again: मुंबईकरांसाठी आजपासून मोनोरेल सेवेला सुरुवात; उद्यापासून मेट्रो धावणार, पहा काय आहेत नवे नियम)

दरम्यान, लोकल ही सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात यावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. कारण ऑफिसला जाण्यासाठी नागरिकांना दोन-तीन तास बससाठी थांबावे लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडीची समस्या ही काही वेळेस उद्भवत आहे. याच कारणास्तव आता लोकल सुरु करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करण्यात येत आहे. मात्र कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहता लोकल सुरु करण्याचा निर्णय अद्याप सरकारकडून घेण्यात आलेला नाही.