राज्य सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात केल्याचे शिवसेना नेते आणि पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांसह उद्योगपतींसोबत तिसऱ्या कोरोनाच्या लाटेवर नियंत्रण कसे मिळवावे यासंदर्भात चर्चा केली आहे. त्यानुसार, आमचे प्रथम उद्दिष्ट हे नागरिकांचे जीव वाचवणे असल्याचे आदित्य ठाकरे यांनी एका न्यूज चॅनलसोबत बोलताना म्हटले आहे.(Mumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक)
गेल्या वर्षात आम्ही 20 हजार बेड्स मुंबईत उपलब्ध करुन देण्याचा विचार केला होता. त्यामध्ये 70 टक्के ऑक्सिजन बेड्स असतील. मात्र आता मुंबईत आम्ही 30 हजार बेड्स उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचसोबत संपूर्ण महाराष्ट्रत पाच लाख बेड्सची उपलब्धता करुन देऊ असे आदित्य ठाकरे यांनी पुढे म्हटले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे.(ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची 'Oxygen Express' धावणार, कळंबोली स्टेशनवरून विशाखापट्टणमच्या दिशेने एक्सप्रेस होणार रवाना)
राज्य सरकारकडून सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती संदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. त्याचसोबत नागरिकांना कोरोनाचे नियम पाळण्यासाठी वारंवार सांगितले जात आहे. तरीही नागरिकांकडून उल्लंघन केले जात असल्याने थेट आता कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी येत्या 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यानुसार फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांसाठी सुरु असणार आहेत. त्याचसोबत संध्याकाळी 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आली आहे.
तर महाराष्ट्र सरकारने गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ला संवेदनशील ठिकाणे म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांची प्रवासापूर्वी 48 तासांच्या आत नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे बंधनकारक केले आहे.