Anil Deshmukh | | (Photo credit: Facebook)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे सरकारकडून लॉकडाउनचे आदेश आणखी काही दिवस वाढवला आहे. या काळात फक्त अत्यावश्यक सेवासुविधा नागरिकांना पुरवल्या जाणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात कोरोना व्हायरससंबंधित काही अफवा, खोटी माहिती पुरवली जात आहे. यामुळे संबंधित व्यक्तींवर कारवाई सुद्धा करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आतापर्यंत समाजमाध्यमांवर तेढ निर्माणकरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून 201 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 37 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे.

लॉकडाउनच्या काळात नागरिकांनी घरीच थांबा अशा वारंवार सुचना देण्यात आल्या आहेत. तरीही काही नागरिक सकाळच्या वेळेस भाजीपाला खरेदी करण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियात कोरोनासंबंधित खोटी माहिती दिली जात आहे. मात्र तुम्ही जर सोशल मीडियात सध्याच्या परिस्थितीसंबंधित खोटी माहिती किंवा अफवा पसरवल्यास थेट पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत  समाजमाध्यमांवर तेढ निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात 37 जणांना अटक करण्यात आली आहे.(ठाणे येथे 20 वर्षीय व्यक्तीकडून दोन पोलिसांवर हल्ला, आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल)

दरम्यान, मुंबईत आज नवे 183 रुग्ण आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत आतापर्यंत 1936 कोरोनाबाधित रुग्ण आणि 113 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 181 जणांचा आता पर्यंत डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. तर धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 30 पेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण आणि 3 पेक्षा अधिक जणांचा मृत्यु झाला आहे.तर महाराष्ट्रात आज 232 कोरोनाबाधित नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2916 वर पोहचल्याची माहिती देण्यात आली आहे.