Coronavirus: जेष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्याकडून मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी खासदार निधीतून 1 कोटी रुपयांचे योगदान
P Chidambaram | (Photo Credits: ANI)

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पीएम केअर फंड्सच्या माध्यमातून नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आर्थिक मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात पीएम केअर्स फंड्स(PM Cares Fund) मध्ये बड्या उद्योगपती ते सामान्य व्यक्ती पर्यंत आपल्या परीने आर्थिक मदत केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर जेष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी त्यांच्या खासदार निधीतून 1 कोटी रुपयांचे योगदान मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयासाठी (St. George Hospital) दिले आहे.

पीएम केअर्स फंड्स नंतर महाराष्ट्रात सुद्धा राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आर्थिक मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यांच्या या उपक्रमाला ही भरघोस प्रतिसाद दिला जात आहे. त्यानंतर आता जेष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाला 1 कोटी रुपयांचे दान दिले आहे. डॉ. सेंट जॉर्ज रुग्णाल हे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केल्या जाणाऱ्या एका रुग्णालयापैकी एक आहे.(COVID 19: डोंबिवली मधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची विषाणूवर मात; कस्तुरबा रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज)

दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाचाउद्रेक दिवसागणिक अधिकच भीषण होत आहे. सोमवारी महाराष्ट्रात कोरोनाची 33 नवे प्रकरणे समोर आली आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये कोरोनाचे 19 , मुंबई मध्ये 11 आणि अहमदनगर, वसई, सातारा येथून प्रत्येकी 1 नवं कोरोना प्रकरण उघड झाले आहे. कयानुसार कोरोनाच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या ही 781 वर पोहचली आहे.