Rerserve Bank of India. (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरबीआयने त्यांच्या कामकाजाबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आरबीआयने (RBI) त्यांच्या कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने कंपन्यांना त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या 50 टक्के जणांना घरुन काम करण्याचे आदेश दिले आहेत. हाच आदेश आरबीआयने सुद्धा गंभीर्याने घेतला आहे. आरबीआयचे जे कर्मचारी घरुन काम करु शकतात त्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. हा आदेश आजपासून ते 31 मार्च पर्यंत लागू करण्यात आला आहे.

भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून 169 वर आकडा पोहचला आहे. विविध राज्यातील स्थानिक सरकारने सुद्धा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतांश कंपन्यांनी कर्मचाऱ्यांनी घरुनच काम करावे असे सांगितले आहे. मात्र ज्यांची खरच ऑफिसात गरज आहे तेच लोक कामावर जाऊ शकतात.(पुणे : Coronavirus च्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना Work From Home ची सूट न दिल्यास होणार कडक कारवाई; खाजगी कंपन्यांना PMC चा इशारा)

 आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसीची बैठक 31 मार्च नंतर होणार आहे. असे सांगितले जात आहे की, आरबीआयने त्यांच्या कर्मचाऱ्यांना घरुन काम करण्यास सांगितले असले तरीही कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवून असणार आहेत. आरबीआयकडे व्याजदरात कपात करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, जगभरात दोन लाखापेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तर 8 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटली येथे 2503 जणांचा मृत्यू आणि युरोप येथे 3437 लोकांचा मृत्यू झाला आहे.