Chief Minister Uddhav Thackeray, Raj Thackeray | (Photo Credit: Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विरोधातील लढाईत सहकार्य आणि सूचना केल्याबद्धल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि मित्रपक्षांतील नेत्यांसह विरोधकांचेही विशेष आभार मानले आहेत. कोरोना व्हायरस हे केवळ युद्धच नव्हे तर जीवघेणा खेळही आहे. या खेळाला सामोरे जात असताना सामूहिक सहकार्य आवश्यक आहे. जे मला राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पक्षासोबतच विरोधी पक्षाकडूनही मिळते आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना व्हायरस संकट आणि उपाययोजना यावर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना विरुद्धच्या लाढाईत महाविकास आघाडी सरकारमधील असलेले सर्व पक्ष सहकार्य करत आहेत. या पक्षातील नेते अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल देशमुख हे सर्व माझ्या सोबत आहेत. राजेश टोपे यांना तर आपण दररोजच पाहात असता. विरोधी पक्ष नेतेही सहकार्य करत आहेत. राजही काही सूचना करत असतो. किती आणि कोणाकोणाची नावं घ्यायची. या लढाईत जे जे सहकार्य करत आहेत त्या सर्वांचे आभार, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: सहकार्य करा, कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टर, परिचारीका आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि स्वत:चा जीव धोक्यात घालूनही काम करत आहेत. या सर्वांना माझा मानाचा मुजरा आहे, असेही म्हटले. उद्धव ठाकरे यांनी पुन्हा पु्न्हा राज्यातील जनतेला विनंत केली की, काहीही करा. पण, घरात बसा, गर्दी टाळा. तुमची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे. फक्त आपण घरात बसून सहकार्य करा. कोणत्याही स्थितीत सरकारला कठोर कारवाई करण्यास भाग पाडू नका, असेही ते म्हणाले.