सध्याचा काळ मोठा धामधुमीचा आहे. कोणताही देश एकमेकांच्या सहकार्यास येईल अशी वेळ आता राहीली नाही. कोरोना संकट जगावरच आले आहे. अशात जगाचा अभ्यास करण्यास आपल्याला काही वेळ मिळाला. त्याचा अभ्यास करुन आपण काही उपाययोजना केल्या आहेत. आपण परिस्थिती नियंत्रणात ठेवतो आहोत. कृपया गर्दी टाळा, सरकारला सहकार्य करा. कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका, असे अवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी जनतेला केले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यात असलेल्या लॉकडाऊन (Lockdown) परिस्थितीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाध साधला या वेळी ते बोलत होते.
उगाच धोका वाढवू नका
या वेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील कामगार, मजूरांना विनंती आहे की, आपण कुठलेही असा. जिथे आहात तिथेच थांबा. खास करुन परराज्यातील मजूरांनीही राज्य सोडण्याची आवश्यकता नाही. आम्ही आपल्या जेवणाची आणि भोजनाची व्यवस्था करत आहोत. संकट अत्यंत भयावह आहे. उगाच प्रवास करुन धोका वाढवू नका. हेही वाचा, Lockdown-COVID-19: कोरोना व्हायरस हेल्पलाईन नंबर; देशभरातील राज्यांसह पाहा तुमच्या राज्याचा Coronavirus Helpline Number)
ऊसतोड कामगारांची काळजी घ्या
साखर कारखान्यांनीही आपले कारखाने किती दिवस सुरु राहतील हे पाहा. पण, उतसोड कामगारांची काळजी घ्या. राज्य सरकार आपल्या सोबत आहे. त्यांच्या भोजनाची, निवासाची व्यवस्था करा. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. राज्यांतर्गत वाहतूक बंद झाली आहेत. त्याची नोंद घ्या, असे अवाहनही उद्धव यांनी साखर कारखानदारांना केले.
पोलीस हे सुद्धा माणूसच आहेत
काही लोक कारणाशिवाय घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांची पोलिसांसोबत झटापट होत आहे. शेवटी पोलिसही माणूस आहे. तोही आपला जीव धोक्यात घालून काम करत आहे. त्यामुळे पोलिसांना सहकार्य करा. तुम्ही सहकार्य कराल तर पोलिसांना कायद्याचा वापर करण्याची आवश्यकता भासणार नाही. मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे की, कारणाशिवाय कठोर निर्णय घ्यायला राज्य सरकारला भाग पाडू नका, असा इशाराही उद्धव यांनी राज्यातील जनतेला दिला.
सरकारी सूचनांचे पालन करा
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कोरोना व्हायरस हा जीवघेणा खेळ आहे. या खेळाला सामोरे जाताना राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावले टाकत आहे. अशा स्थितीत राज्य सरकार लॅब, बेड, आणि अलगीकरण कक्ष वाढवत आहेत. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते आहे. त्यामुळे घाबरु नका. परंतू काळजी घ्या. सरकारी सूचनांचे पालन करा.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे ही बाब खरी आहे. पण, यात समाधानाची बाब अशी की, उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. यापुढे कदाचीत न्यूमोनिया रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्युमोनियाची लक्षणे दिसणारा कोणताही रुग्ण आला तरी त्याला हलक्यात न घेता त्याची रक्तचाचणी, एक्सरे काढा. निदान करुन उपचार करा, असा सल्लाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना दिला.