चीनच्या वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रात सुद्धा झाला आहे. याचा फटका नागरिकांसह उद्योगधंद्यांना सुद्धा बसला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण झाल्याची 19 प्रकरणे समोर आली आहेत. नागरिकांना कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून वारंवार काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. पण काही जणांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर चिकन, मटण आणि मासे खाणे बंद केल्याने त्यांच्या उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. तर पुण्यात सुद्धा पोल्ट्री फार्मर्सला या कोरोनाचा फटका बसल्याने त्यांचे खुप नुकसान झाले आहे. ऐवढेच नाही तर त्यांना 10 रुपये किलोने चिकनची विक्री करावी लागत आहे.
पोल्ट्री फार्मर्सचे असे म्हणणे आहे की, नागरिकांनी कोरोना व्हायरसच्या भीतीपोटी चिकन खाणे टाळले आहे. त्यामुळे चिकनची मागणी पूर्णपणे थांबली आहे. तर काही आठवड्यांपूर्वी 100 रुपये किलो रुपयांनी विकले जाणारे चिकन आता 10 रुपये किलोने विकले जात आहे. पोल्ट्री फार्मर्स असोसिएशन यांच्यामते संपूर्ण राज्यात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच युपी येथील पोल्ट्री फार्म असोसिएशनचे अध्यक्ष नबाव अली यांनी सुद्धा असे म्हटले आहे की,कर्नाटकात सर्वाधिक स्वस्त कोंबडा 10 रुपयाने विकला जात आहे. तेलंगणा येथे 11, आंध्र प्रदेशात 12, मध्य प्रदेशात 22 रुपयांनी विकला जात आहे. होलसेल विक्री करणाऱ्यांनी तर गल्ली गल्लीत जाऊन 100 रुपयांचे तीन कोंबडे 22 रुपयांना विक्री करत आहेत.(Coronavirus चा आंबा निर्यातीलाही फटका बसण्याची शक्यता)
चिकनच्या दर जसे कमी झाले आहे त्याप्रमाणे अंड्यांच्या किंमती सुद्धा कमी झाल्या आहेत. कोरोनामुळे अंड्यांचे दर 2.75 रुपयांनी कमी झाले आहेत. हा दर पोल्ट्री फार्म आणि होलसेलर यांच्यामधील आहे. मात्र अंड्याचे दर कमी झाल्याचा फायदा रिटेल ग्राहकाला मिळणार नाही आहे. कारण स्टॉक करणाऱ्या संधीचा फायदा घेत पोल्ट्री येथून स्वस्त दरात अंड्यांची खरेदी करुन ते कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवले जात आहेत.