Coronavirus: मृत्यू प्रमाणपत्रांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापा- नवाब मलिक
PM Narendra Modi | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा फोटो कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर छापला जात आहे. जर कोरोना लस घेतल्यावर मिळणाऱ्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात असेल तर तसाच फोटो कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गामुळे मृत्यू झाला तर त्यानंतर मिळणाऱ्या मृत्यू प्रमाणपत्रावरही छापायला हवा, असे महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी म्हटले आहे. देशात आणि देशातील विविध राज्यांमध्ये कोरोना व्हायरस (Remdesivir) प्रादुर्भाव हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतो आहे. देशात आणि राज्यात कोरोना व्हायरस यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच कारणीभूत आहेत. नमस्ते ट्रम्प कार्यक्रमामुळे जगभरातील लोक भारतात आले तसेच कोरोना नियंत्रणासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांना उशीर झाला, असेही मलिक यांनी म्हटले आहे. आयोजित पत्रकार परिषदेत ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र सरकारवर सनसनाटी आरोप करत नवाब मलिक यांनी म्हटले की, कोरोना व्हायरस संक्रमित (Coronavirus) रुग्णांना आवश्यक असलेल्या रेमिडिसीव्हर औषधांचा पुरवठा महाराष्ट्राला करु नका. अन्यथा तुमचा परवाना रद्द करु असा दबाव केंद्र सरकारने औषध कंपन्यांवर टाकला आहे. रेमडिसीव्हर औषध निर्माण कंपन्यांकडे आम्ही औषध पुरवठ्यासाठी परवानगी मागितली तेव्हा आम्हाला ही माहिती समजले असेही नवाब मलिक म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: महाराष्ट्राला Remdesivir देऊ नका, अन्यथा परवाना रद्द करु, केंद्राचा औषध कंपन्यांवर दबाव; नवाब मलिक यांचा आरोप)

नवाब मलिक यांनी म्हटले की, रोम जळत होते तेव्हा निरो फिडेल वाजवत होता. भारतातही अशीच स्थिती आहे. कोरोना व्हायरस संक्रमनामुळे भारतालील लोक मृत्यमुखी पडत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुका घेण्यात व्यस्त आहेत. देशातील कोरोना स्थितीकडे पंतप्रधानांचे लक्ष नाही. पंतप्रधानांना या घटनेचे गांभीर्यच नाही. राज्याचे मुख्यमंत्री कोरोना परिस्थिती संदर्भात त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधत आहेत. परंतू, पंतप्रधान कार्यालयातून त्यांना सांगण्यात येते की पंतप्रधान निवडणुक प्रचारासाठी पश्चिम बंगालमध्ये आहेत.

देशात कोरोना व्हायरस आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच केले. जगभरात कोरोनाचा कहर वाढत असताना त्यांनी भारतात 'नमस्ते ट्रम्प' हा कार्यक्रम केला. या कार्यक्रमासाठी जगभरातील लोक भारतात मोठ्या प्रमाणावर आणले. या कार्यक्रमसाठी देशाची हवाईस्थळं बंद करण्यात आले नाहीत. परिणामी भारतात मोठ्या प्रमाणावर कोरोना व्हायरस पसरला. आता देशात कोरोना लसीकरण सुरु आहे. कोरोना लस घेतल्यानंतर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापला जात आहे. जर कोरोना लस प्रमाणपत्रावर जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असेल तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या प्रमाणपत्रावरही पंतप्रधानांचाच फोटो छापायला हवा, असा घणाघातही नवाब मलिक यांनी केला.