Coronavirus: राजकारण्यांना क्वारंटाईन केले पाहिजे: संजय राऊत
Shiv Sena MP Sanjay Raut |(Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना 'राजकारण्यांनाच क्वारंटाईन करायला हवे' अशी मिश्कील टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी राजकारण विसरुन एकत्र यायला हवे. सर्वांनी एकत्र आले तरच या संकटाचा सामना जिद्दिने करता येईल, असे संजय राऊत यांनी या वेळी म्हटले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, सध्या मुख्यमंत्र्यांना पदावरुन हटविण्यासाठी सोशल मीडियावर जे ट्रेंड चालवले जात आहेत ते पाहता राजकारण्यांनाच क्वारंटाईन करायला हवे. केवळ सर्वसामान्य जनताच नव्हे तर, लोकप्रतिनिधिंनी, सेलीब्रेटी मंडळींनीही काळजी घ्यायला हवी. एका पार्टीत सहभागी झालेल्या एका गायिकेलाही कोरोना व्हायरस झाल्याचे स्पष्ट झाले. या पार्टीत आमचे एक खासदार बंधुही उपस्थित होते

कोरोना व्हायसस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आपण काय काळजी घेत असता संजय राऊत म्हणाले, 'मी कुठेच जात नाही. मी दै. सामना कार्यालयात क्वारंटाईन आहे. दै. सामना कार्यालय हेच माझे घर आहे.' दरम्यान, हा आजार वाटतो तितका सोपा नाही. त्याच्या विरोधात लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचेही संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Coronavirus: बाप सांगतोय म्हटल्यावर प्रश्नच मिटला! त्याचा पासपोर्ट दाखवू का?; अजित पवार यांचा पत्रकारांना सवाल)

दरम्यान, कोरोना व्हायरस नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार विशेष काळजी घेत आहे. त्यासाठी गर्दी नियंत्रीत राहील याबाबत विचार करत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख शहरांतील दुकाने बंद ठेवण्याचे अवाहन केले. तसा आदेशही दिला. त्यानंतर मुंबई महानगर , पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर मधील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तूंव्यतिरिक्त) आणि कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.