Representational Image (Photo Credits: Pixabay)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा दिवगणिक वाढत चालला आहे. त्यामुळे नागरिकांना घरातच थांबून कोरोनाच्या विरोधात लढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर विविध रुग्णालयातील वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनावर उपचार घेऊन त्यांची प्रकृती सुद्धा सुधारली आहे. याच पार्श्वभुमीवर पालघर (Palghar) मधील एका 3 वर्षाच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली असून तिला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधनाता आपल्याला लॉकडाउनमुळे कोरोनाचा वेग संथ करण्यास यश आल्याचे म्हटले होते. तसेच सरकार कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात येत्या 3 मे पर्यत लॉकडाउन कायम राहणार आहे. मात्र त्यानंतर कोरोनाची परिस्थिती पाहून लॉकडाउन संबंधित निर्णय सरकार घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत बहुतांश कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ज्या रुग्णांनी कोरोनाच्या विरोधातील लढाई यशस्वीरित्या लढून घरी गेले आहेत त्यांचे टाळ्या वाजवून नागरिकांकडून स्वागत केले जात आहेत. यामध्ये 3 वर्षाच्या चिमुकलीपासून ते वयोवृद्धांचा सुद्धा समावेश आहे.(मुंबई: प्रतिक्षा नगर मधील दोन पत्रकारांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी आल्याने टाळ्या वाजवून स्वागत Watch Video)

दरम्यान, राज्याची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी नॉन कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी लॉकडाउनचे काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी कोरोनाची सध्याची परिस्थिती पाहून त्या संबंधित नियमांचे पालन करावे अशा सुचना सुद्धा दिल्या जात आहेत.