कोरोना व्हायरसच्या वाढत्या धोक्यामुळे नवी मुंबई (Navi Mumbai) वाशी (Vashi) येथील APMC भाजीपाला, फळ मार्केट शनिवारी (11 एप्रिल) बंद करण्यात आले होते. त्यानंतर आता धान्य, मसाले याचे होलसेल मार्केटही बंद करण्यात आले आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, माल वाहतूक करणारे आणि माथाडी कागमार यांनी राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे काम न करणाऱ्या निर्णय घेतला आहे. बुधवारी वाशी येथील एक ट्रेडर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यामुळे APMC मार्केटच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच पनवेल APMC मार्केट देखील बंद राहणार आहे. पनवेल APMC मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी वाशी येथील एपीएमसी भाजीपाला, फळ बाजार बंद ठेवण्यात आला होता. (ठाणे, पुणे, नवी मुंबई शहरात एपीएमसी कांदा-बटाटा, भाजीपाला, फळ मार्केट 14 एप्रिलपर्यंत बंद)
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. दर दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र तरी देखील भाजी मंडईत नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. (ठाणे: Coronavirus Lockdown चे नियम कडक करत मुंब्रा, कळवा परिसरात दूध, भाजीपाला मार्केट बंद ठेवण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश)
महाराष्ट्र राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या एकूण 1982 झाली आहे. तर भारतात सध्या कोरोनाचे एकूण 9152 रुग्ण आहेत. गेल्या 24 तासांत 308 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर 35 जणांचा मृत्यू झाला आहे. 856 रुग्णांची उपचारानंतर प्रकृती सुधारल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा कालावाधी संपत आला असून महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवला आहे.