Coronavirus: पुणे येथे एक दिवसाचा चिमुकला कोरोना व्हायरस संक्रमन मुक्त; महापौर मुरलीधर महोळ यांची माहिती
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

एक दिवसाच्या चिमुकल्याला कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, जन्माला आल्यावर केवळ एकाच दिवसात हा चिमूकला कोरोना व्हायरस संक्रमनमुक्तही झाला आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातील पौड फाटा परिसरात ही घटना घडली. पुण्याचे महापौर मुलरीधर महोळ (Murlidhar Mohol) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पौड फाटा परिसरातील एक माता आपल्या एक दिवसाच्या चिमुकल्यासोबत ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली. तिच्यासोबत चिमुकलाही होता. दरम्यान, या चिमूकल्याला कोरोना व्हायरस संक्रमनापासून मुक्त करण्यात ससून रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले.

पुण्याचे महापौर मुरलीधीर मोहोळ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''जन्माला आल्यावर पहिल्याच दिवशी कोरोनाची बाधा झालेल्या चिमुकल्याने कोरोनावर मात केलीय. पौड फाटा परिसरातील या चिमुकल्याला कोरोनाबाधित आईसोबतच २० जुलैला ससूनमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक अभिनंदन''.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज घडीला कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 49217 इतकी झाली आहे. त्यापैकी 29489 इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) मिळाला आहे. आतापर्यंत 1182 कोरोना संक्रमितांचा पुणे जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. 97 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. प्रकृती गंभीर असून अतिदक्षता विभागात उपचार सुरु असलेल्यांची संख्या 647 इतकी आहे. होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांची संख्या 7896 इतकी आहे. (हेही वाचा, आनंदाची बातमीः मुंबईमध्ये तब्बल 3 महिन्यानंतर एका दिवसात फक्त 700 कोरोना विषाणू रुग्णांची नोंद; आज शहरात झाल्या सर्वाधिक 8776 चाचण्या)

मुरलीधर महोळ ट्विट

दरम्यान, पुण्यात कोरोना व्हायरस संसर्ग होऊन रुग्णसंख्या वाढीचा वेग (डबलींग रेट) 21.33 दिवसांवर गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 248514 इतक्या कोरोना व्हायरस चाचण्या केल्या आहेत. तर 56112 दशलक्ष इतके नमुने गोळा करण्यात आले. एकूण निश्चित रुग्णसंख्येचे प्रमाण 18% , अॅक्टीव्ह रेशो 37%, रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 59.92%, फल्टीरिटी रेट 2.40% आणि क्रिटीकल रेट 4.01% इतका राहिला आहे.