Coronavirus | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस (Coronavirus) रुग्णांची एकूण संख्या 29,100 इतकी झाली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरना व्हायरस संक्रमित 1,576 नव्या रुग्णांची नोंद झाली. आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 49 रुग्ण दगावले. राज्यात मृत्यू झालेल्या कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 1,068 इतकी झाली आहे. राज्याच्या आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस रुग्णांची सर्वाधिक संख्या ही मुंबई जिल्ह्यात आहे. मुंबईत आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमित 933 रुग्णांची नोंद झाली. तर, 24 रुग्ण दगावले. या रुग्णांची कोरोना व्हायरस चाचणी पॉजिटीव्ह आली होती. दरम्यान, मुंबईतील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 17512 इतकी झाली आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोना व्हायरस संक्रमित 655 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उपचार घेऊन बरे होणार्या रुग्णांचा आकडाही मोठ्या प्राणावर वाढतो आहे. मुंबई शहरात आतापर्यंत उपाचर घेऊन प्रकृती सुधारल्याने आणि बरे वाटू लागल्याने 4658 जणांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज देण्यात आला आहे. (हेही वाचा, BMC: मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 933 रुग्णांची नोंद तर, 24 जणांचा मृत्यू)

पीटीआय टविट

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संक्रमनात जसा मुंबईचा क्रमांक अव्वल आहे. त्याच प्रमाणे मुंबईत धारावी परिसराचा क्रमांक कोरोना संक्रमनात अव्वल आहे. धारावी परिसरात आज दिवसभरात कोरोना व्हायरस संक्रमन झालेले 84 नवे रुग्ण आढळले. धारावीतील एकूण कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या आता 1145 इतकी झाली आहे. या परिसरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आकडा 53 इतका आहे.