BMC: मुंबई शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ; दिवसभरात 933 रुग्णांची नोंद तर, 24 जणांचा मृत्यू
प्रतिनिधित्व प्रतिमा (Photo Credit: Getty)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईतील (Mumbai) नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत मुंबई शहरात आढळून आले आहेत. मुंबईत आज 933 कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडली आहे. यामुळे  मुंबईत कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 17 हजार 512 वर पोहचली आहे. यापैकी 655 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 हजार 658 जण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील धारावी (Dharavi) परिसरात कोरोना विषाणूचे जाळे मोठ्या वेगाने पसरत चालले आहे. धारावीत आज 84 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 145 वर पोहोचली आहे. तर, कोरोनाबळींची संख्या 53 वर पोहचली आहे. प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. येथील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. मात्र, तरीही धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. येथील मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले आहे. त्यामुळे करोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेऊन त्यांची तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच धारावी परिसर अधिक मोठा असल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाबाधीत रुग्ण हे मुंबई परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहे. हे देखील वाचा- मुंबई: भाजपा नेते राम कदम यांनी पोस्ट केला केईएम हॉस्पिटल मध्ये रूग्णांना होणार्‍या गैरसोयीचा व्हीडिओ; सरकारला जाग कधी येणार? विचारला सवाल

मुंबईतील आजची आकडेवारी-

 

धारावीतील आजची आकडेवारी-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. भारतातही कोरोना विषाणूचे जाळे आता संपूर्ण देशात पसरत चालले आहे. सध्या भारतात एकूण 81 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 2 हजार 649 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 27 हजार 920 जण कोरोनामुक्त झाले आहे.