KEM Hospital| Photo Credits: Twitter/ ANI

मुंबईकरांच्या भोवती कोरोना व्हायरसचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे. परिणामी वाढणारी रूग्णसंख्या आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढवत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या सायन रूग्णालयातील परिस्थितीचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपा नेते राम कदम (BJP leader Ram Kadam)  यांनी परेलच्या केईएम हॉस्पिटल मधील (King Edward Memorial Hospital)  परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यामध्ये काही रूग्ण जमिनीवरच झोपले असल्याचं पहायला मिळालं आहे. राम कदम यांनी असा दावा केला आहे की, हॉस्पिटलमध्ये रूग्णांसाठी खाटा अपुर्‍या पडत असल्याने त्यांना जमिनीवरच झोपावं लागत आहे. मुंबई: सायन हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांच्या शेजारी मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल; BMC चे चौकशीचे आदेश

दरम्यान कोरोनाग्रस्त रूग्णांवर मुंबईच्या पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जात आहे. सोबतच खाजगी रूग्णालयांना देखील कोव्हिड 19 साठी काही बेड्स राखीव ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. काल (14 मे) दिवशी राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसारे सर्वाधिक 991 रूग्ण शहरात आढळले आहे. त्यामुळे आता त्यांना उपचारांसाठी कुठे दाखल करायचं हा प्रश्न भेडसावत आहे. दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता मुंबईत बीकेसी, गोरेगाव येथे मोकळ्या जागेवर खास कोव्हिडच्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी तात्पुरती आरोग्य केंद्र उभारण्याचं जाम युद्धपातळीवर सुरू आहे.

ANI Tweet

Ram Kadam यांनी शेअर केला KEM Hospital मधील कोरोना रुग्णांची परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ - Watch Video

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 27,524 पर्यंत पोहचला आहे. तर मुंबईमध्ये 17377 जणं कोरोनाबधित आहेत. धारावी, वरळी कोळीवाडा, चेंबुर सह शहरातील झोपडपट्टीसह दाटीवाटीच्या परिसरामध्ये कोरोना झपाट्याने फैलावत आहे.