देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती अधिक गंभीर असून नागरिकांनी सरकारच्या नियमांचे पालन करावे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 1380 वर पोहचला आहे. तर मुंबईतील दादर येथे आज कोरोनाचे नवे 6 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनापासून बचाव करायचा असेल तर घरीच थांबा. तसेच सोशल मीडियात कोरना व्हायरससंबंधित विविध माहिती दिली जात आहे. मात्र सोशल मीडियावर आता कोरोना संबंधित अफवा किंवा चुकीची माहिती दिल्यास थेट कारवाई केली जाणार आहे. याबाबत पोलीस आयुक्तांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलिस उपायुक्त (ऑपरेशन्स) मुंबई यांनी सीपी ग्रेटर मुंबईच्या नियंत्रणाखाली सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत आदेश पाठविला असून विविध संदेशन व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे चुकीची माहिती प्रसारित करण्यास मनाई केली आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची नावे, संपर्क, पत्ता यासंबंधित माहिती देण्यास परवनागी नाही आहे. ऐवढेच नाही तर जातीय, धार्मिक तेढ वाढवणारे मेसेज, कोरोना संबंधित भीतीदायक मेसेज, कोरोनासंबंधित खोटी माहिती किंवा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट करणे आता महागात पडणार आहे.(सांगली मध्ये 26 पैकी 22 जण कोरोनामुक्त; पालकमंत्री जयंत पाटील यांनी विलगीकरणाचा प्रयोग यशस्वीरित्या निभावलेल्या स्थानिकांचे मानले आभार)
Deputy Commissioner of Police (Operations) Mumbai has promulgated an order under Section 144 of CrPC, in the areas under the control of CP Greater Mumbai, prohibiting dissemination of incorrect info through various messaging&social media platforms.#COVID19 pic.twitter.com/9pClcrDXj4
— ANI (@ANI) April 10, 2020
यापूर्वी सुद्धा सोशल मीडियात खोटी माहिती परसवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, तर भारतात 547 नव्या रुग्णांसह आज कोरोना बाधितांची एकूण संख्या 6412 इतकी झाली आहे. यात गेल्या 12 तासांमध्ये 30 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या खूपच धक्कादायक असल्याचे आरोग्य मंत्रलायाकडून सांगण्यात येत आहे.