Coronavirus infection | Image used for representational purpose (Photo Credits: Pixarby)

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा  (Coronavirus) वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तसेच महाराष्ट्राची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली असून त्यानुसार विविध क्षेत्रातील कोरोनाची परिस्थिती पाहून नियम शिथिल करण्यात आले आहेत. याच पार्श्वभुमीवर मुंबईकरांसाठी एक दिलालायदायक बातमी आहे. कारण मुंबईतील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी (Worli), प्रभादेवी (Prabhadevi) मधील 9 ठिकाणे कन्टेंमेंट झोन (Containment Zone) मधून वगळण्यात आली आहेत. ही सर्व ठिकाणे जी दक्षिण वॉर्ड मधील असून तेथे गेल्या 10 दिवसात एकही नवा कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळून आलेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे.

जी दक्षिण विभागात मोडणाऱ्या वरळी आणि प्रभादेवी येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने त्यांना कन्टेंमेंट झोनमध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे कोरोनाची परस्थिती पाहता या ठिकाणी लॉकडाउनचे नियम अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु गेल्या 10 दिवसात एकही कोरोनाच रुग्ण न आढळून आल्याने तेथील 9 ठिकाणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. यामध्ये आदर्श नगर, सिद्धी प्रभा इमारत, वरळी पोलीस कॅम्प, साती आसरा, उत्कर्ष इमारत, बीडीडी चाळ, लोढा वर्ल्ड वन, आनंदछाया बिल्डिंग आणि आहुजा बिल्डिंग यांना कन्टेंटमेंट झोन मधून वगळण्यात आले आहे.(Coronavirus: महाराष्ट्रातील COVID-19 संक्रमित रुग्णांची जिल्हानिहाय आकडेवारी; आजचे ताजे अपडेट एका क्लिकवर) 

परंतु वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर आणि जनता कॉलनीत यापुढे सुद्धा कोरोनासंबंधितचे निर्बंध लागू राहणार आहेत. तर मुंबईत सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने रेड झोन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच थांबावे असे आवाहन वारंवार सरकारकडून करण्यात येत आहे. देशभरात कोरोनाचे संक्रमित रुग्णांची संख्या 21393 वर पोहचली असून 681 जणांचा बळी गेला आहे.