Devendra Fadnavis | (Photo Credits: ANI)

राज्यासमोर कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट असताना महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमधील मंत्री अभासी जगात (Virtual World) जगत आहत. सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काहींना प्रवक्ता करुन सरकारला लढाई जिंकू असं वाटतंय. मात्र जमीनीवरची परिस्थीती वेगळी आहे. लोकांना आरोग्य सेवा मिळत नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध नाही. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. जनतेध्ये सरकारच्या मनात प्रचंड असंतोष आहे. सरकार मात्र नेमके काय करतंय हे कोणालाच कळत नाही, अशा शब्दात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केल आहे.

करोना संकटात महाारष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी मेरा आंगन मेरा रणांगण असे आंदोलन भाजपकडून करण्यात येत आहे. या आंदलनात सहभागी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. केंद्र सरकारने पॅकेज दिलं. देशभरातील विविध राज्यांनी पॅकेज दिले आहे. कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडने पॅकेज दिले, मात्र महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पैशाव्यतिरिक्त एक नवा पैसा खर्च करायला तयार नाही, केंद्राने 468 कोटी दिले, याशिवाय 1600 कोटी रुपये मजुरांच्या स्थलांतरासाठी दिले. महाष्ट्र सरकार मात्र एक नवा पैसा खर्च करत नाही. कोणतंही पॅकेज देत नाही. केंद्र सरकारने देलेले पैसेही राज्य सरकार खर्च करत नाही. केंद्राने 20० लाख कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलं, पण राज्य सरकारने एक दमडीचंही पॅकेज दिलं नाही, राज्य सरकार अंग चोरुन काम करतंयअसा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

दरम्यान,  महाराष्ट्र सरकार अंग चोरून काम करते आहे. राज्यातील कोरोना रुगणांची संख्या वाढत असताना राज्य सरकार कुचकामी ठरत आहे. रुग्णांना आठ तासांहून अधिक काळ झाला तरी रुग्णवाहीका मिळत नाही. मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणावर कोरना व्हायरसचे रुग्ण वाढत आहेत. असे असताना सरकार काहीच करत नाही. खासगी रुग्णालयात सामान्यांना उपचार घेणे परवडत नाही, देशात कोरोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण 4  टक्के, महाराष्ट्रात12.5  तर मुंबईत 13.5 टक्के आहे. सर्व महानगरात कोरोनाचा कहर, मात्र राज्य सरकारची तयारी नाही, BKC ला सेंटर उभं केलंय पण ते दोन दिवसात भरुन जाईल आणि पाऊस पडला तर या सेंटरचं काय होईल? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. (हेही वाचा, मुंबईतील कोरोनाची स्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर- देवेंद्र फडणवीस)

एएनआय ट्विट

महाराष्ट्र सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. प्रत्यक्षात काहीच करत नाही. शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात पडून आहे. केंद्राचे पैसे राज्य सरकार खर्च करत नाहीय, रेशनही केंद्राने पुरवले, आता खरिपाचा हंगाम आहे, अजूनही कापूस घरी आहे, पीकं पडून आहेत, शेतकमाल उचलला नाही, शेतकरी हवालदिल आहे. या पिकांची खरेदी होते त्याचे पैसे केंद्र देते, पण राज्याने ती खरेदी करायची असते, पण ते कामही राज्य करत नाहीय, केंद्राने राज्याला पैसेही दिले आहेत. आता खरिपाचा हंगाम आहे, शेतकऱ्यांना जी मदत हवी, त्याबद्दल काही पावलं उचलली नाहीत, मजूर, बारा बलुतेदार संकटात आहेत, त्यांना कोणतीही मदत राज्य सरकारने केलेली नाही, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

जे काही करायचं ते केंद्र सरकार करत आहे. मात्र, केंद्राकडे तितकी यंत्रणा नसते. त्यामुळे केंद्र सरकारचा पैसा आणि राज्य सरकारची यंत्रणा असे काम करावे लागते. मात्र, महाराष्ट्र सरकार ते करताना दिसत नाही. गावातील बारा बलुतेदारांना कोरोना व्हायरस संकटात अद्यापही काही मिळाले नाही. त्यांचे व्यवसाय ठप्प आहेत. शेतकरी, असंघटित कामगार, रिक्षाचालक, मजूर, बारा बलुतेदार अशाप्रकारच्या सर्व गरिबांसाठी 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज द्यावं असेही देवेंद्र फडणवीस या वेळी म्हणाले.