BJP Leader Devendra Fadnavis | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूचे (Coronavirus) जाळे अधिक वेगाने पसरत चालले आहे. एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट वावरत असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारच्या कामगिरी पश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मुंबईतील (Mumbai) करोनाची परिस्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचे चित्र सध्या दिसते आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाराष्ट्रासह मुंबईतही सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासकीय अनुभव नाही. यामुळे लॉकडाउनपासून ठाकरे सरकारने धोरणात्मक निर्णय घेण्यात या सरकारने चुका केल्या आहेत, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

भारतात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. राज्यात आज 2 हजार 345 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर, 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 642 वर पोहचली आहे. यापैकी 1 हजार 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 11 हजार 726 जणांनी कोरोनावर मात केली आहे. हे देखील वाचा- Coronavirus: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा

एएनआयचे ट्वीट- 

दरम्यान, कोरोनाचा धोका पूर्णत: ओळखल्याशिवाय कोरोनाविरोधातील लढाई अपूर्णच राहील. मुंबईत प्रतिदिन 10 हजार चाचण्यांची क्षमता असताना केवळ चार ते साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत आणि त्या पूर्वीच्या तुलनेत कमी झालेल्या आहेत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. अखिल अमिराती मराठी इंडियन (आमी परिवार) यांनी कळविल्यानुसार, दुबई, अबुधाबी येथे 6000 हून अधिक महाराष्ट्रीयन अडकून आहेत. जर्मनीत 100 हून अधिक महाराष्ट्रातील विद्यार्थी, युक्रेनमध्ये 300 हून अधिक विद्यार्थी, तसेच ऑस्ट्रेलिया व इतर देशांतही अनेक महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत. ही परवानगी राज्य सरकारने द्यावी, अशीही मागणी फडणवीस यांनी केली आहे.