महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील 100 टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope (Photo Credits: ANI)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारकडून कोरोनाबाधित रुग्णांसाठी राज्यातील विविध ठिकाणी आयसोलेशन वॉर्डची निर्मिती केली जात आहे. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांवर अहोरात्र वैद्यकिय कर्मचारी, डॉक्टर्स आणि नर्स यांच्याकडून उपचार केले जात आहेत. याच दरम्यान आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील 100 टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देणार असल्याचा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. राज्यातील नागरिकांना मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमे राज्य असल्याचे ही सांगण्यात आले आहे.

1 एप्रिल पासून नागरिकांना कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा वापर करता येणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. विविध उपचार घेण्यासाठी नगरिकांना सरकारच्या योजनांचा लाभ घेता येतो. त्यापैकीच एक असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोरोना व्हायरससंबंधित उपचार घेता येतात. कोरोना व्हायरसचा वेग लॉकडाउनमुळे संथ करण्यास यश आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.(महाराष्ट्रातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना ग्रस्तांच्या उपचारासाठी घोषित, येथे पाहा यादी) 

तसेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केलेल्या गरीब कल्याण योजना अंतर्गत या पॅकेज अंतर्गत सुमारे 8 श्रेणी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार गरीब विधवा-पेंशनर्स-दिव्यांग, जनधन योजना-उज्ज्वला स्कीम, सेल्फ हेल्प ग्रुप (वुमन), ऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स यांना EPFO च्या माध्यमातून, कंस्ट्रक्शन वर्कर्स आदींनाही या पॅकेजचा लाभ मिळणार आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या दरम्यान 1,70000 कोटी रुपयांचे खास पॅकेज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे.